उन्हाळी भातशेतीतून हमखास उत्पन्नाचा मार्ग

उन्हाळी भातशेतीतून हमखास उत्पन्नाचा मार्ग

Published on

-rat२४p१५.jpg-
२६O१९८३६
पावस ः गावडे आंबेरे येथे रवींद्र बिर्जे यांनी केलेल्या उन्हाळी भात लागवडीची पाहणी करताना सहाय्यक कृषी अधिकारी डी. डी. राऊत.
--------
काही सुखद---लोगो

उन्हाळी भातशेतीतून उत्पन्नाचा मार्ग
गावडे आंबेरेतील रवींद्र बिर्जेंचा यशस्वी प्रयोग; इंद्रायणी वाणाची लागवड, वर्षभराच्या अन्नसुरक्षेची खात्री
सुधीर विश्वासराव ः सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २४ ः एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येणे, शेतीकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन आणि आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकरी शेतीपासून दूर जात असताना, रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे बिर्जेवाडी येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र बिर्जे यांनी पारंपरिक भातशेतीला नवे वळण देत उन्हाळी भातशेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.
शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालल्यामुळे भातशेती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण पुढे करत अनेक शेतकरी नोकरीधंद्याकडे वळत आहे. परिणामी, भातशेतीकडे वळण्याचा कल दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक भातशेतीला उपजीविकेचे साधन बनवत पावसाळी भातशेतीबरोबरच उन्हाळी भातशेतीकडे विशेष लक्ष केंद्रित करून हमखास उत्पन्नाचा मार्ग रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे-बिर्जेवाडी येथील प्रगतशील शेतकरी बिर्जे यांनी यशस्वीरीत्या अवलंबला आहे.
पावसाळी हंगाम संपल्यानंतर त्याच जमिनीत उन्हाळी भातशेती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दरवर्षी वेगवेगळ्या भाताच्या वाणांचा वापर करून प्रयोग सुरू करण्यात आला. यावर्षी २५ गुंठ्यांमध्ये इंद्रायणी वाणाची लागवड करण्यात आली असून, १ डिसेंबरला पेरणीला सुरुवात झाली. त्यानंतर भात लावणी करण्यात आली. सुमारे १३५ दिवसांचा कालावधी असलेल्या इंद्रायणी वाणाची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली असून, सध्या चांगले उत्पादन मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरेल, असा विश्वास बिर्जे यांनी व्यक्त केला आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम होत असल्यामुळे पावसाळी भातशेतीचे उत्पन्न कमी होते; परंतु उन्हाळी भातशेतीचे उत्पन्न २५ गुंठ्यामध्ये सुमारे १ हजार किलो तांदूळ उत्पादित केला जातो. त्यामुळे उन्हाळी शेती फायदेशीर ठरत आहे
---
कोट
शेतीसाठी पंपाने पाणी द्यावे लागते. गायी व म्हशी असल्यामुळे त्यांचे शेण शेतामध्ये वापरल्याने चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होते. त्यामुळे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. कारण, पावसाळ्यामध्ये बदलत्या हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. सध्या पंपाच्या माध्यमातून भात लागवडीला पाणी लावले जाते. पाणी कमी प्रमाणात वापरता यावे यासाठी भविष्यात स्पिंकलर बसवण्याचा मानस आहे.
--रवींद्र बिर्जे, शेतकरी
---------
कोट
उन्हाळी भात लावणीपासून काढणीपर्यंत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षणाखाली हे क्षेत्र राहणार आहे. सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, उन्हाळी भात लागवडीमध्ये कीडरोग प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी उन्हाळी लागवड करावी.
--ज्ञानेश्वर राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com