शहराबाहेरील विक्रेत्यांना चिपळुणातून हटवले
-rat२४p९.jpg-
P२६O१९७८६
चिपळूण ः चिपळूण पालिकेने हटवलेल्या गाड्या.
-----
शहराबाहेरील विक्रेत्यांना
चिपळुणातून हटवले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः चिपळूण शहरात शहराबाहेरील एकाही विक्रेत्याला बसू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी यापूर्वीच व्यापाऱ्यांसोबतच्या झालेल्या बैठकीत मांडली होती. तरीही शनिवारी सकाळी बाहेरील विक्रेत्यांच्या गाड्या शहरात उभ्या असल्याचे फोटो व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगराध्यक्षांनी प्रशासनाला धारेवर धरले.
नगराध्यक्षांच्या सूचनेनंतर प्रशासनाने तत्काळ शहरात मोहीम राबवत सर्व बाहेरील विक्रेत्यांच्या गाड्या शहराबाहेर हटवल्या. नगराध्यक्ष सकपाळ म्हणाले, स्थानिक व्यापाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

