क्राईम

क्राईम

Published on

गावठी दारूची विक्री
करणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील चांदोर-उगवतीवाडी येथे बंद घराच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गावठी दारूची विक्री करणाऱ्या प्रौढाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. २३) करण्यात आली. राजू राधा गुळेकर (वय ५७, रा. उगवतीवाडी-चांदोर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार महेश कुबडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी संशयित हा चांदोर येथे विनापरवाना आपल्या ताब्यात ५०० रुपयांची ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

बेकायदेशीर दारूसाठा
करणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः मंडणगड तालुक्यातील अडखळ येथे बेकायदेशीरपणे देशी दारूच्या १२ बाटल्या आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. २३) रात्री ८.३० वा.सुमारास करण्यात आली. शिवाजी तुकाराम महाडीक (वय ६४, रा. अडखळ मंडणगड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार विनय पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा शुक्रवारी रात्री एका घराच्या पाठीमागील आडोशाला आपल्या ताब्यात देशी दारूच्या ९६० रुपयांच्या १२ बाटल्या विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com