रत्नागिरी- गोगटे कॉलेजच्या १९७४ च्या बॅचचे दशकपूर्ती स्नेहसंमेलन

रत्नागिरी- गोगटे कॉलेजच्या १९७४ च्या बॅचचे दशकपूर्ती स्नेहसंमेलन

Published on

rat25p1.jpg-
19939
रत्नागिरी : दशकपूर्ती स्नेहसंमेलनात सहभागी गोगटे कॉलेजच्या १९७४ च्या बॅचचे माजी विद्यार्थी.

ऋणानुबंध परिवारातील ५ कर्तृत्ववान मातांचा सन्मान
गोगटे कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन ; १९७४ च्या बॅचचची दशकपूर्ती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : येथील र. प. गोगटे महाविद्यालयाच्या १९७४ च्या कला शाखेच्या (बीए) बॅचचे दहावे दशकपुर्ती स्नेहसंमेलन रत्नागिरीत पार पडले. सुमारे ७० ते ८० वयोगटातील ३० ज्येष्ठांनी कॉलेज जीवनानंतरच्या वाटचालीतील परस्परांच्या सुखदुःखाची आठवणी शेअर केल्या. विशेष म्हणजे ऋणानुबंध परिवारातील पाच कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात आला.
१९७४ च्या बॅचचे हे सलग दहावे स्नेहसंमेलन असल्याने सर्वांमध्ये मोठा उत्साह होता. पहिले संमेलन श्री गणपतीपुळे क्षेत्र येथे झाले होते. त्यामुळे दहाव्या संमेलनाची सुरुवात श्री गणपतीपुळे येथे श्री गणेश दर्शनाने करण्यात आली. कणकवलीचे विद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वललाने सुरुवात झाली. ऋणानुबंध परिवारातील डॉ. विजया जोशी, शमीम मुकादम, शैला खानोलकर, निर्मला आचरेकर, माया शिंदे या कर्तृत्ववान मातांचा भावपूर्ण वातावरणात शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेकांना आपल्या आठवणी विशद करताना भावना आवरता आल्या नाहीत. त्यानंतर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्याना गौरविण्यात आले. यावेळी नव्याने परिवारात सामील झालेल्या नंदकुमार तांबे आणि श्री. पेंढारकर यांचे स्वागत करण्यात आले त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गजानन नाईक यांनी प्रास्ताविक केले. माया देसाई शिंदे, सविता विलणकर, डॉ. विजया जोशी, रमेशभाई सुर्वे, निसार नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले.
करमणुकीचे कार्यक्रम आणि खेळ यामध्ये भालचंद्र करंदीकर यांचा तळीराम हा एकपात्री प्रयोग कमालीचा रंगला. ज्येष्ठ कवी शरदचंद्र नातू यांनी बहारदार कविता अभिनयासह सादर करून वाहवा मिळविली. राजन खानविलकर, शैला खानोलकर, नीला जोशी चितळे, नीला दामले, सुचिता बंदरकर, रजनी आचरेकर यांनी एकापेक्षा एक सरस गीते गाऊन कार्यक्रमात रंगत भरली. रात्री शेकोटीचा कार्यक्रम म्हणजे संगीताची मैफल ठरली. मुस्ताक पेटकर, दिलावर मुकादम, नीता आरेकर, विद्या ताडपत्रीकर, बाबा पिलणकर, विश्वनाथ शिर्के, आकाश शिंदे, पद्मजा शितोळे आदींनी उत्साहाने सहभाग घेऊन स्नेहसंमेलन यादगार ठरवले. या संमेलनात कॉलेज जीवनातील आणि कॉलेजमधील प्राध्यापकांच्या आवर्जून आठवणी काढून त्यांचे ऋण व्यक्त केले.
समारोप सत्रात मुख्य राजेंद्र सावंत यांनी आपला परिवार आणि मैत्री कायम ठेवण्याचे आवाहन केले. राजन खानविलकर आणि गजानन नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com