कोकण रेल्वेचे स्वप्न प्रा. दंडवतेंनी साकारले
19980
कोकण रेल्वेचे स्वप्न
प्रा. दंडवतेंमुळे साकार
दीपक भोगटे ः कट्टा येथे अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ ः अशक्यप्राय वाटणारी कोकण रेल्वे साकारण्याचे महत्त्वाचे कार्य प्रा. मधू दंडवते यांनी केले. भारताचे अर्थमंत्री, रेल्वेमंत्री नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष या सर्वोच्च पदावर काम करूनही आपली साधी राहणी व निष्कलंक चारित्र्य शेवटपर्यंत त्यांनी जपले. पंचवीस वर्षे लोकसभेत कोकणचे नेतृत्व केले. आपले सारे जीवन सर्वसामान्यांसाठी वेचले, अशी आदरांजली बॅ. नाथ पै सेवांगणचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक भोगटे यांनी अर्पण केली.
बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा (ता. मालवण) येथे कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांना त्यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहाण्यात आली. यावेळी किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, विद्या चिंदरकर, साक्षी अमरे, मंगल पराडकर, मनोज काळसेकर, श्रीधर गोंधळी, रिया जांभवडेकर व शिवण विभागाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रारंभी प्रा. दंडवते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री. भोगटे यांनी दंडवते यांच्या समग्र चरित्राचा आढावा घेतला. प्रा. दंडवते यांनी आपला देह सुद्धा जे.जे. रुग्णालयात दान केला, असे सांगत आपण सर्वांनी त्यांच्या विचाराचा मागोवा घेत काम करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

