नाथ पैंनी लोकशाही नीतिमूल्ये जपली

नाथ पैंनी लोकशाही नीतिमूल्ये जपली

Published on

19970

नाथ पैंनी लोकशाही नीतिमूल्ये जपली

जयप्रकाश चमणकर ः कुडाळात ५५व्या पुण्यतिथीनिमित्त वंदन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः जनता हीच आपल्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा मानून जगलेले, भोळ्याभाबड्या कोकणी लोकांवर मनापासून प्रेम करणारे व त्यांच्या अभ्युदयाचा ध्यास घेणारे बॅ. नाथ पै हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी समाजसेवक जयप्रकाश चमणकर यांनी केले.
येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त व बॅ. नाथ पै यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, ‘‘लोकशाहीची नीतिमूल्य कृती-उक्तीतून लोकांसमोर ठेवणारे, लोकांप्रतीच्या तळमळीमुळे लोकांच्या आदरास पात्र ठरलेले बॅ. नाथ पै हे अद्वितीय व्यक्तिमत्व होते. त्यांची संसदेतील अभ्यासू भाषणे ऐकण्यासाठी पंतप्रधानांसह विरोधी पक्षातील खासदार उपस्थित राहत असत. बेळगाव सीमा प्रश्नावर त्यांनी तळमळीने त्यांनी कार्य केले व शेवटपर्यंत ते सीमावासीयांसाठी लढा दिला. हा लढा देत असतानाच ते आपल्यातून निघून गेले. त्यांचे हे कार्य आजही नवतरुणांना प्रेरणा देणारे आहे.’’यावेळी त्यांनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या सुनियोजित आयोजनाबद्दल व स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजयी व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले. जयप्रकाश चमणकार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके वितरित करण्यात आली. व्यासपीठावर प्रा. अरुण मर्गज, प्रा. कल्पना भंडारी, प्रा. चैताली बांदेकर, प्रा. परेश धावडे, पल्लवी कामत आदी उपस्थित होते. विजय स्पर्धकांतर्फे साक्षी साळकर व रुपेश आळवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंदार जोशी यांनी केले.
---
लोकशाही मार्गाने वाटचाल करा!
उमेश गाळवणकर म्हणाले, ‘‘स्वतःशी स्पर्धा करा. निश्चित वेळी योग्य ठिकाणी पोहोचू शकाल. स्पर्धांतून, वर्तमानपत्रांतून व्यक्त व्हा. समाजाशी संवाद साधा. लोकशाही मार्गाने वाटचाल करा; अन्यथा क्रांतीसाठी सज्ज व्हा. पूर्वीची नेतेमंडळी नीतीमूल्य जगणारी होती, तर आताची मंडळी मालमत्ता, सत्तेसाठी जगत आहेत. हे अंतर कमी करायचे काम तरुणांनी करायचे आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com