बिबवणेत शनिवारी व्हॉलीबॉल स्पर्धा
बिबवणेत शनिवारी
व्हॉलीबॉल स्पर्धा
कुडाळ ः बिबवणे येथील स्वराज मित्रमंडळाच्यावतीने समीर चव्हाण स्मृती चषक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा शनिवारी (ता. ३१) आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर (ग्रामपंचायत कार्यालयानजीक) होणार आहे. प्रथम क्रमांक १२,२२२, द्वितीय ७,७७७ व प्रत्येकी चषक, वैयक्तिक विजेत्यांसाठी रोख रक्कम व चषक तसेच अंतिम सामन्यातील दोन्ही संघांतील खेळाडूंना पदक देण्यात येणार आहे. स्पर्धा सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी बंटी कोरगावकर, गौरव वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
..................
बस्तान फर्नांडिस
‘उत्कृष्ट प्राचार्य’
ओटवणे ः मूळच्या सावंतवाडी येथील आणि सध्या मुंबई-झरी येथील ज्ञानमाता आश्रम शाळेच्या प्राचार्या बस्तान फर्नांडिस यांच्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या सावंतवाडी फातिमावाडा येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण सावंतवाडीत मिलाग्रीस हायस्कूलमध्ये झाले आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर केला होता. फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानमाता आश्रम शाळेने शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी या यशाचे श्रेय संस्था तसेच आपल्या सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह पालकांना दिले. या पुरस्काराबाबत त्यांचे सर्व क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
....................
रेडी नवदुर्गा देवी
जत्रोत्सव उद्या
सावंतवाडी ः रेडी कनयाळ येथील देवी नवदुर्गा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी (ता. २७) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ९ पासून धार्मिक विधी, महापूजा, आरती, सामुदायिक गाऱ्हाणे व महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. सकाळपासून देवीची खणा-नारळाने ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे तसेच पुराण वाचन, काकडा धरणे आदी कार्यक्रम, रात्री १२ वाजता टाळ मृदंगाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत देवीची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांचे दशावतारी नाटक व दहिकाला होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी देवीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी नवदुर्गा देवस्थानने केले आहे.
...................
मांजलकरवाडी-लोरेत
गुरुवारी ‘रस्सीखेच’
वैभववाडी ः श्री दत्त सेवा ग्रामस्थ मंडळ मांजलकरवाडी-लोरे क्र. २ या मंडळातर्फे भव्य रस्सीखेच स्पर्धा गुरुवारी (ता. २९) सायंकाळी सहाला प्राथमिक शाळा विद्यामंदिर मांजलकरवाडी पटांगणावर आयोजित केली आहे. प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार, उत्तेजनार्थ १ हजार रुपये व चषक अशी बक्षिसे आहेत. इच्छुक संघांनी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे घनश्याम नावळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

