आयुर्वेदिक महाविद्यालय उपाध्यक्षपदी अमोल सावंत
20022
आयुर्वेदिक महाविद्यालय
उपाध्यक्षपदी अमोल सावंत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः येथील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संस्थापक मंडळाच्या उपाध्यक्षपदी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल संस्थेचे संचालक अमोल सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या संस्थेच्या उपाध्यक्षपदी यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राणी पार्वती देवी हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत हे गेले कित्येक वर्ष होते. त्यांच्या निधनानंतर या रिक्त पदी श्री. सावंत यांची निवड करण्यात आली. श्री. सावंत यांनी यापूर्वी माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले असून त्यांना प्रशासकीय कामाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवड अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर व मंडळाने केली. सूचक संचालक उमाकांत वारंग व अनुमोदन गुरुदास मठकर यांनी केले. राणी पार्वती देवी हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत व संचालक मंडळाने सावंत यांचे अभिनंदन केले.

