साखरपा-कर्तव्यपथावर परेडची संधी हा संस्मरणीय क्षण

साखरपा-कर्तव्यपथावर परेडची संधी हा संस्मरणीय क्षण

Published on

-rat25p27.jpg-
20014
कॅडेट कॅप्टन अमिषा संतोष केदारी
-----------
प्रजासत्ताक दिन विशेष---लोगो

कर्तव्यपथावर परेडची संधी हा संस्मरणीय क्षण
देवरुखच्या कॅडेट कॅप्टन अमिषा केदारी ; जागवल्या आठवणी
अमित पंडित ः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २५ : प्रजासत्ताक दिन म्हणजे दिल्लीतील कर्तव्य पथावरील संचलन. राष्ट्रपतींना दिलेला सॅलूट आणि अमर जवान स्मारकाला दिलेली मानवंदना. हे सगळे क्षण भारावणारे होते, अशा आठवणी देवरूख येथील आठल्ये सप्रे पित्रे कॉलेजच्या एनसीसीची माजी विद्यार्थिनी कॅडेट कॅप्टन अमिषा संतोष केदारी हिने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जागवल्या. २०२३ मध्ये अमिषाला कर्तव्यपथावर संचलन करण्याचा मान मिळाला होता.
अमिषा केदारी ही देवरुखच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाची विद्यार्थिनी. तिने महाविद्यालयाच्या एनसीसीच्या नेव्ही विंगमध्ये प्रवेश घेतला. सबलेफ्टनंट उदय भाटये यांनी तिला दिल्लीतील संचलनाची आणि त्यासाठीच्या निवड प्रक्रियेची माहिती दिली. २०२२ च्या उन्हाळ्यातच आमिषाने तयारीला सुरुवात केली. दर रविवारी कॉलेजच्या मैदानावर होणारी एनसीसीची परेड तिने कधीही चुकवली नाही. तिची आणि तीन कॅडेट्सची कॉलेजमधून पुढील टप्प्यासाठी निवड झाली. त्यानंतर ती कोल्हापूरच्या ट्रेनिंग कॅम्पसाठी निवडली गेली. तिथे ७०० एनसीसी कॅडेट्स होते. त्यातील केवळ ४१ कॅडेट्सची निवड पुण्याच्या कॅम्पसाठी निवड झाली. पुण्यात गार्ड ऑफ ऑनरचे ट्रेनिंग दिले गेले. तिथे झालेल्या सात कॅम्पमध्ये काही कॅडेट्स कमी होत होते. या सगळ्या कॅम्पमधून निवड होत आमिषाची निवड दिल्लीतील प्रजासताक दिनाच्या कॅम्पसाठी झाली.
२०२२ डिसेंबरला, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या तब्बल एक महिना आधी अमिषा तिच्याबरोबर निवड झालेल्या कॅडेट्ससह दिल्लीला पोहोचली. कडाक्याची थंडीत पहाटे सरावाला सुरुवात व्हायची आधी पाच किलोमीटर धावणे, त्यानंतर रायफल हातात परेडचा सराव. प्रत्यक्ष प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी धवलकुवा परिसरातील मैदानापासून एक एक रेजिमेंटचे ट्रक बाहेर पडतात. संसद भवन ते इंडिया गेट हा सुमारे अडीच किलोमीटरचा कर्तव्यपथ असून तिथे राष्ट्रपतींना सलामी दिली जाते. पुढे इंडिया गेटजवळ अमर जवान स्मारकाशी सलामी देऊन तिथून पुढे लाल किल्ल्यापर्यंत १४ किलोमीटर ही परेड मार्च करत जाते. लाल किल्ल्यावर संचलन संपते, अशी माहिती कॅडेट कॅप्टन अमिषा केदारी हिने दिली.

कोट
संपूर्ण देशातून एनसीसीच्या १७ डायरेक्टरेटमधून आलेल्या कॅडेट सहभागी झाल्या होत्या. ज्या महाराष्ट्र डायरेक्टरेटमध्ये आम्ही सहभागी होतो, त्या डायरेक्टरेटला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. त्याचा खूप आनंद झाला.
- अमिषा केदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com