मुख्यमंत्री फडणवीस चिपळुणात फड गाजवणार
मुख्यमंत्री फडणवीस चिपळुणात फड गाजवणार
बुधवारी जाहीर सभा ; भाजपकडून सर्व ताकद पणाला
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ता. २८) चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची बहादूरशेखनाका येथील स्वातंत्रवीर सावरकर मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरी जिह्यातील ही एकमेव जाहीर सभा असल्याने भाजपकडून सर्व ताकद पणाला लावली जात आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीने जोमाने प्रचार सुरू ठेवला आहे. जिल्ह्यातील प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देखील आता मैदानात उतरले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन जाहीर सभा घेणार आहेत. यातील चिपळूणच्या सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने स्वातंत्रवीर सावरकर मैदानाची संयुक्त पाहणी करत सभास्थळ, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ, गर्दी नियंत्रण आदी बाबींचे सविस्तर नियोजन केले. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या या जाहीर सभेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार असून, चिपळूणचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

