विशाखा चिंदरकर पैठणीच्या मानकरी

विशाखा चिंदरकर पैठणीच्या मानकरी

Published on

20052

विशाखा चिंदरकर पैठणीच्या मानकरी

बांद्यातील स्पर्धा; पिंपळेश्वर गणपती मंदिर मंडळाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः माघी गणेश जयंती निमित्ताने पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्रमंडळातर्फे आयोजित ‘संगीत खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात विशाखा चिंदरकर यांनी विजेतेपद पटकावले, तर गौतमी गोवेकर उपविजेत्या ठरल्या. तृतीय क्रमांक तनुश्री परब यांनी मिळविला. तसेच उत्तेजनार्थ नीलम पटेल, सावली कामत, सानवी बुटे यांना गौरविण्यात आले.
विजेत्या चिंदरकर यांना मानाची पैठणी, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डिंगणे माजी सरपंच नितीन सावंत यांनीही विजेत्यास रोख २००० रुपये दिले. उपविजेत्या गोवेकर यांना पैठणी व स्मृतिचिन्ह, तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या परब यांना पैठणी व स्मृतिचिन्ह देऊन गौरविले.
या कार्यक्रमाचे उद्‍घाटन डिंगणेचे माजी सरपंच सावंत, महिला भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच दीपक सावंत, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सुरेश चिंदरकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील माजगावकर, उपाध्यक्ष सचिन वीर, रुपेश माजगावकर, दादा साळगावकर आदींच्या उपस्थितीत झाले.
महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते. प्रारंभी सुमारे ६० महिला सहभागी झाल्या. प्रत्येक फेरीत बाद प्रक्रिया असल्याने शेवटी निवडक सहा महिला अंतिम फेरीत पोहोचल्या. अंतिम फेरी अत्यंत चुरशीची ठरली. तीन स्पर्धकांचे गुण समान आल्याने पुन्हा अंतिम फेरी घेण्यात आली. या निर्णायक फेरीत विशाखा चिंदरकर यांनी बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. बक्षीस वितरण दिगंबर गायतोंडे, समीर धारगळकर, गजानन गायतोंडे, सचिन वीर, अनिल माजगावकर, रुपेश माजगावकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी, राकेश परब यांनी केले. गजानन गायतोंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com