सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्रमंडळातर्फे पुरस्कारांची घोषणा
O20077
संजय तांबे, श्याम तेंडोलकर
kan252.jpg
संजय तांबे यांना साहित्य मित्र तर,
श्याम तेंडोलकरांना संगीत मैत्र पुरस्कार
सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्रमंडळातर्फे पुरस्कारांची घोषणा
कणकवली, ता. २७ : सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संगीत मित्र मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य आणि संगीत क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात साहित्य मैत्र पुरस्कारासाठी फोंडाघाट येथील लेखक संजय तांबे यांची त्यांच्या ‘समाजभान’ या वैचारिक ग्रंथासाठी तर संगीत मैत्री पुरस्काराठी कुडाळ येथील गायक वादक कलावंत श्याम तेंडोलकर यांची निवड केली आहे. २ हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ३१ जानेवारी रोजी कणकवली मराठा नाट्यगृह येथे होणाऱ्या दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनात या पुरस्काराने श्री. तांबे आणि श्री. तेंडोलकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ कवी अजय कांडर आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.
गेल्या वर्षापासून सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्र मंडळतर्फे साहित्य आणि संगीत क्षेत्रातील कलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य संगीत संमेलन आयोजित केले जाते. यानिमित्त साहित्य आणि संगीत क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध केलेल्या कलावंताना साहित्य मैत्र आणि संगीत मैत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.या वर्षीच्या या पुरस्कारासाठी कवी अजय कांडर आणि महेंद्र चव्हाण या परीक्षक मंडळाने या दोन पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.
संजय तांबे हे कोकणातील ज्येष्ठ लेखक कवी असून गेली ४० वर्षे निष्ठेने लेखन करत आहेत. त्यांची एकूण तीन पुस्तके प्रकाशित झाली असून सभाजभान या ग्रंथाला हा साहित्य मैत्र पुरस्कार जाहीर झाला आहे. तर संगीत मैत्र पुरस्कार दिलेले श्याम तेंडुलकर हे कुडाळ येथील लोकप्रिय कलावंत असून शास्त्रीय संगीत, ख्याल गायन,तबला व हार्मोनियम वादन यात त्यांचे मोठे नाव लौकिक आहे. राजन माडये,(आग्रा घराणे) बाळ आंबर्डेकर यांच्याकडे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली असून दूरदर्शनवरही त्यांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

