रत्नागिरीत ५०० किलो ई-कचऱ्याचे संकलन

रत्नागिरीत ५०० किलो ई-कचऱ्याचे संकलन

Published on

rat२७p४.jpg-
२६O२०१४६
रत्नागिरी : ई-कचरा संकलन मोहिमेत खराब संगणक गौरांग आगाशे यांच्याकडे देताना नागरिक तर दुसऱ्या छायाचित्रात खराब कीबोर्ड रत्नाकर जोशी यांच्याकडे देताना नागरिक.
---
रत्नागिरीत ५०० किलो ई-कचऱ्याचे संकलन
अनबॉक्स, पूर्णमचा पुढाकार; कायमस्वरूपी केंद्र करण्याचा मनोदय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : येथील अनबॉक्स युअर डिझायर आणि पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ५०० किलो ई-कचरा संकलनाचे काम प्रजासत्ताकदिनी करण्यात आले. शहर व कारवांचीवाडीपर्यंत एकूण १४ केंद्रांवर कचरा गोळा करण्यात आला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. कायमस्वरूपी संकलन केंद्र करण्याबाबत अनबॉक्स सकारात्मक असल्याचे उद्योजक गौरांग आगाशे यांनी या वेळी जाहीर केले.
ई-यंत्रणा उपक्रम प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यांतील १०३० केंद्रांवर पार पडला. खेडशी येथील अनुश्रुती एन्टरप्रायझेसच्या संकलन केंद्रावर याच उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी खेडशीचे सरपंच वसंत बंडबे, अनबॉक्स युअर डिझायरचे गौरांग आगाशे, पूर्णमच्या प्रतिनिधी रोहिणी सोनावणे, श्रीनगर सर्वांगीण विकास मंडळाचे अध्यक्ष अनुप नलावडे, नेहा गोखले आणि प्रमोद कोनकर, अनिकेत कोनकर उपस्थित होते. संकलन केल्यानंतर जो ई-कचरा अशा प्रकारे वापरता येण्यासारखा नसतो तो प्रदूषण मंडळाची मान्यता असलेल्या रिसायकलिंग कंपन्यांकडे दिला जातो जेणेकरून त्याचा पर्यावरणावर कोणताही घातक परिणाम होत नाही, असे सोनावणे यांनी सांगितले.
या उपक्रमात रत्नाकर जोशी, चिन्मय भागवत, गुरुप्रसाद जोशी, महेंद्र दांडेकर, नेहा गोखले, शरदचंद्र वझे, भाग्यश्री सुर्वे, सुबोध वाघरे, पार्थ जोशी, शुभानन आंबर्डेकर, स्पृहा जोगळेकर, अंकिता मोरे, कपिल शेवडे यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले.
----
कोट १
वाढता इलेक्ट्रॉनिक कचरा तसेच प्लास्टिक कचरा हा कोणत्याही एका ठिकाणचा नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे. त्यामुळे त्या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी अनेक संस्थांनी काम करणे आवश्यक आहे. ई-कचरा हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या समस्येबद्दलची जागरूकता शाळा-महाविद्यालयांमध्ये करणे खूप गरजेचे आहे.

- रवींद्र इमानदार, माजी अध्यक्ष
जिल्हा विज्ञान शिक्षक संघटना.
----
कोट २

ज्या ई-कचऱ्यातील कॉम्प्युटर किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य दुरुस्त करून पुन्हा वापरण्यासारखे असते, त्याची दुरुस्ती करून ते गरजू शाळांना दिले जाते. आतापर्यंत एक हजारांहून अधिक कॉम्प्युटर्स अशा प्रकारे दुरुस्त करून शाळांना दिले आहेत. प्लास्टिकपासून बेंचेस किंवा बॅरिकेड्‌स अशा उपयुक्त वस्तू तयार करून त्याही दान केल्या जातात.

- रोहिणी सोनावणे, पूर्णम इकोव्हिजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com