प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

Published on

rat27p1.jpg-
P26O20143
रत्नागिरी ः प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
rat27p2.jpg-
26O20144
कवायत करताना पोलिस दल
----
प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा
पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन; सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण; पोलिस, एनसीसी, नेव्हीचे संचलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : येथील पोलिस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. या वेळी पोलिस, एनसीसी, नेव्ही, होमगार्ड संचलन, चित्ररथाबरोबरच विद्यार्थ्यांनी सादर केलेले दिमाखदार विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे आजच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर मुख्यालय पोलिस पथक, पुरुष पोलिस पथक, महिला पोलिस पथक, पुरुष गृहरक्षक दल, पोलिस बँड पथक, गृहरक्षक महिला पथक, गोगटे महाविद्यालयाचे एनसीसी आर्मी, गोगटे महाविद्यालय एनसीसी नेव्ही, नवनिर्माण इंग्लिश मीडियम हायस्कूल एनसीसी नेव्ही, पटवर्धन हायस्कूल आर्मी एनसीसी, कॉन्व्हेंट स्कूल नेव्ही, रा.भा. शिर्के हायस्कूल नेव्ही, पटवर्धन हायस्कूल नेव्ही, ए.डी. नाईक गर्ल हायस्कूल स्काऊट गाईड, जीजीपीएस इंग्लिश स्कूल एनसीसी नेव्ही, मेस्त्री हायस्कूल एनसीसी नेव्ही, गोदूताई जांभेकर विद्यालय एनसीसी आर्मी, नवोदय विद्यालय स्टुडण्ट पोलिस कॅडेट, पोलिस श्वानपथक, अग्निशमन दल, प्राथमिक शिक्षण विभाग आदींनी संचलन करून मानवंदना दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांच्या संकल्पनेतून, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या मार्गदर्शनातून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रवींद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षण विभाग, समग्र शिक्षांअंतर्गत केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्या सहकार्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व गुणवत्तावाढ या विषयावर चित्ररथ साकारला होता. युनेस्कोने जागतिक वारसायादीत समावेश केलेले किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेचे साक्षीदार आहेत. याचे दर्शन घडवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांसाठी नासा इस्रो निवड चाचणी हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी नासा इस्रो या वैज्ञानिक संस्थांना भेट देऊन आले आहेत. शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषातूनच आत्मनिर्भर भारत साकार होत आहे. या देखाव्याने प्रगत, वैज्ञानिक आणि सशक्त भारताचे दर्शन घडवले.
----
चौकट
सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना जिंकले
आविष्कार संस्थेच्या विद्यार्थ्यांनी डंबेल कवायत, मेस्त्री हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर, फाटक हायस्कूलने लेझीम नृत्य तसेच शिर्के हायस्कूलने योगासने प्रात्याक्षिक, लाठी फिरवणे, तलवारबाजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी असे विविध दिमाखदार नृत्य, खेळ, कार्यक्रम सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com