''एसपीके''मध्ये विविध कलाविष्कार लक्षवेधी

''एसपीके''मध्ये विविध कलाविष्कार लक्षवेधी

Published on

swt279.jpg
20218
सावंतवाडी ः कलादर्पण महोत्सवात विदयार्थिनींनी सादर केलेले समईनृत्य लक्षवेधी ठरले.

‘एसपीके’मध्ये विविध कलाविष्कार लक्षवेधी
‘कलादर्पण’ महोत्सव; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने ‘कलादर्पण’ महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.
या वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य
युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, सहसंचालक शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, महोत्सवाचे समन्वयक डॉ. डी. जी. बोर्डे, डॉ. एस. एम. बुवा, डॉ. एस. ए. देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्धाटन दीपप्रज्वलनाने झाले. कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराज जीवनदर्शन, हिंदी व मराठी चित्रपट गाण्यांवर नृत्य, समूहनृत्य, गायन, समईनृत्य, तबला वाद्य अशा विविध कला सादर केल्या.
याप्रसंगी महाविद्यालयातील शरद डिचोलकर व पियुष बर्डे या विद्यार्थ्यांची भारतीय सेनेमध्ये ''अग्निवीर'' म्हणून निवड झाल्याबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे लखमराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एम. बुवा यांनी केले. आभार डॉ. एस. ए. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये डॉ. डी. जी. बोर्डे यांनी कला, सांस्कृतिक विभागाचा आढावा घेतला. प्रा. दत्तप्रसाद मुळीक यांनी सांस्कृतिक सूत्रसंचालन केले. या वार्षिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com