क्रिकेट स्पर्धेत ''एन. व्ही. बॉईज'' विजेता
swt2713.jpg
20204
सावंतवाडी ः एन. व्ही. बॉईज संघाला राकेश नेवगी स्मृती चषक प्रदान करताना मान्यवर.
क्रिकेट स्पर्धेत ‘एन. व्ही. बॉईज’ विजेता
वैश्यवाडा प्रीमियर लीगः ‘युनायटेड डेव्हिल’ संघ उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः ‘वैश्यवाडा प्रीमियर लीग २०२६’ च्या पहिल्या सत्राचे विजेतेपद धीरज सुकी व गजानन सुकी यांच्या एन. व्ही. बॉईज संघाने मिळवून राकेश नेवगी स्मृती चषकाचे मानकरी ठरले. वैभव म्हापसेकर यांचा युनायटेड डेव्हिल संघ उपविजेता ठरला.
कोलगाव निरुखे येथील तनुश स्पोर्ट क्लबतर्फे वैश्यवाडा कला क्रीडा मंडळ व श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने ही स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली. सकाळी विद्या सुकी व नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका नीलम नाईक, माजी नगरसेवक परिमल नाईक, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद कोदे, माजी अध्यक्ष प्रकाश सुकी, माजी अध्यक्ष दीपक म्हापसेकर, क्रिकेटपटू आनंद आळवे, महेश कोरगावकर, महेश म्हापसेकर, महेश सुकी, आनंद म्हापसेकर, विजय टोपले, मंगेश परब उपस्थित होते.
सूत्रसंचालन संजय म्हापसेकर यांनी केले. दिवसरात्र रंगलेल्या या स्पर्धेमध्ये युनायटेड डेव्हिल (वैभव म्हापसेकर), बिडी वॉरियर्स (दीपक म्हापसेकर, बंड्या सुकी), गोल्डफिश इलेवन (वैशाख मिशाळ), एन. व्ही. बॉईज (धीरज व गजानन सुकी), श्रील वॉरियर्स (धीरेद्र म्हापसेकर), फियरलेस फायटर (अंकिता व राहुल नेवगी) या संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील सर्व सामने उत्कंठावर्धक व अटीतटीचे झाले. स्पर्धेतील मालिकावीर किताब अनिकेत म्हापसेकर (युनायटेड डेव्हिल) याने मिळविला. त्याने सर्वच सामन्यांत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. उत्कृष्ट गोलंदाज अमन शेख (एन. व्ही. बॉईज), उत्कृष्ट फलंदाज राहुल नेवगी (फियरलेस फायटर), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गजानन सुकी यांना गौरविण्यात आले. नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका मोहिनी मडगावकर व नीलम नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी दया शिरसाट, अस्मिता नेवगी, अंकिता बांदेकर, अंकिता म्हापसेकर, श्रीकृष्ण पिळणकर, धोंडी दळवी, राजेश नार्वेकर, सचिन तेली, मनोज शिरोडकर, वैशाख मिशाळ, हनुमंत शिरोडकर, साईनाथ मिशाळ, श्रीरंग म्हापसेकर, आपा कुडतरकर आदी उपस्थित होते.
पंच म्हणून यशवंत गाड, प्रतीक पाटील, गौरेश कुडाळकर, गुणलेखक सुदेश राणे, समालोचक रणजित जाधव, संजय म्हापसेकर यांनी काम पाहिले. विजय सावंत यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

