श्री देव काजरोबा जत्रोत्सव विशेष

श्री देव काजरोबा जत्रोत्सव विशेष

Published on

पुरवणी डोके

श्री देव काजरोबा जत्रोत्सव विशेष

swt2710.jpg
O20201
कवठणी ः येथील श्री देव काजरोबा मंदिर
swt2711.jpg
20202
श्री देव काजरोबा देवस्थान.
swt2712.jpg
20203
जत्रोत्सवा दिवशी मंदिरात अशा प्रकारे केळ्यांच्या घडांची आरास केली जाते.

भक्तांच्या हाकेला धावणारा
श्री देव काजरोबा

लीड
सिंधुदुर्गतील सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध असलेले कवठणी येथील जागृत देवस्थान म्हणजे ‘श्री देव काजरोबा’. श्री देव काजरोबा देवाची जत्रा ‘केळ्याच्या घडांची जत्रा’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. कित्येक भाविकांचे हे श्रध्दास्थान आहे. श्री काजरोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता. २८) साजरा होत आहे, यानिमित्त...
- मदन मुरकर
-------------------
गोवा व सिंधुदुर्गच्या सीमेलगत निसर्गाच्या कुशीत वसलेले कवठणी हे गाव. या गावातील जागृत देवस्थाने म्हणजे श्री देवी माऊली, काजरोबा. या गावातील प्रसिद्ध असलेल्या श्री देव काजरोबा देवाची जत्रा ‘केळ्याच्या घडांची जत्रा’ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. भक्तांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा म्हणून या देवतेची भाविकांमध्ये श्रध्दा आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने या देवतेसमोर नतमस्तक होतात. या जत्रोत्सवादिवशी भाविक आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी व नवस फेडण्यासाठी ‘केळ्यांचा घड’ अर्पण करतात. जत्रेदिवशी गावात जणू उत्सवाचेच स्वरूप असते. सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम, केळ्यांच्या घडांची आरास केली जाते. या दिवशी गोवा, सिंधुदुर्गसहित परगावी असलेले भाविक, चाकरमानी, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
श्री देव काजरोबाचा परिसर कवठणी गावातील निसर्गसंपन्न अशा भागात वसलेला आहे. कवठणी गावातील हा परिसर छोटा असला तरी विलोभनीय आहे. एका बाजूला तेरेखोलची विस्तृत नीळसर खाडी तर दुसऱ्या बाजूला उंच हिरवागार डोंगर, अशा निसर्गरम्य परिसरात कवठणी गाव वसला आहे. शेती, बागायती या मुख्य व्यवसायावर गावाचा आर्थिक डोलारा उभा आहे. हे गाव श्री देव काजरोबा-देवी माऊलीच्या कृपाशिर्वादामुळे सुखी आणि समाधानी आहे.
संपूर्ण सिंधुदुर्ग व गोवा राज्यांतही प्रसिद्ध असणारा श्री देव काजरोबाच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. स्थानिकांकडूनही या जत्रोत्सवाचे नियोजन योग्य असे केले जाते. जत्रेदिवशीचा मुख्य प्रसाद म्हणजे केळी. केळ्यांचा घड देवाला अर्पण करून हजारो भाविक देवाच्या वार्षिक उत्सवावेळी आपला नवस फेडतात. रात्री ९ वाजल्यापासून घडांची पावणी सुरू होते, ती पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू असते. त्यानंतर पार्सेकर दशावतारचा नाट्यप्रयोग होतो.
गावचे दैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गावातील पहिला आणि प्रमुख उत्सव असून, यालाही कवठणी गावाच्या दृष्टीने वेगळे महत्त्व आहे. कवठणीच्या शांत परिसरात माऊलीचे सुंदर पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य पाटावर देवी माऊलीची तेजस्वी भव्य मूर्ती आहे. तिच्या शेजारी श्री देवी सातेरी स्थानबद्ध असून, मंदिरातच पालनकर्ता ''राम पुरुषा''चे पाषाण आहे. मंदिराच्या परिसरात नितकारी, घाडवस, दांडेकर, गणपती यांची छोटीखानी मंदिरे आहेत. मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर असून श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला क्षणभर थांबल्यानंतर एक आत्मिक समाधान लाभते. या गावात वार्षिक जत्रोत्सवाबरोबर मंदिरात वर्षभर इतरही धार्मिक कार्यक्रम होत असतात. यामध्ये श्री माऊलीचा वाढदिवस, रामनवमी, नवरात्रोवातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जत्रेदिवशी मंदिराला खास फुलांची आरास, विद्युत रोषणाई करण्यात येते. वेगवेगळी दुकाने मांडली जातात. यावेळी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. भाविक भक्त श्री काजरोबा देवाच्या चरणी लीन होतात. या दिवशी गावातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले दिसून येते.

चौकट
दोन दिवस विविध कार्यक्रम
जत्रोत्सवानिमित्त गुरुवार (ता. २९) व शुक्रवारी (ता. ३०) विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात गुरुवारी रात्री १ वाजता उद्योजक दत्ता कवठणकर मित्रमंडळ आयोजित डायमंड डान्स क्रिएशन मुंबई यांचा ‘धुंद रंग नृत्याचा’ हा लावणी, फोकडान्स, वेस्टर्न, कॉमेडीचा नृत्याविष्कार असलेला बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच शुक्रवारी रात्री १० वाजता रेन्बो फ्रेंड सर्कल कवठणी यांचे विनोदी नाटक ‘आलाय मोठा शहाणा’ सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कवठणी ग्रामस्थांनी केले आहे.

चौकट
समृध्द वारसा
येथील श्री देवी माऊली, काजरोबा देवाच्या कृपाशिर्वादाने गावात सुख-समृद्धी नांदत आहे. श्री देव काजरोबा वाट चुकलेल्यांना मार्ग दाखविणारा, हाकेला धावणारा व नवसाला पावणारा म्हणून या देवतेकडे भक्तगण मोठ्या श्रद्धेने लीन होताना दिसतात. कित्येकांचे दुःख-यातना या देवतेच्या कृपाशिर्वादाने नाहीशी होतात, याचा प्रत्यय अनेक भाविक भक्तांनी अनुभवला आहे. कवठणी गावात श्री काजरोबा देवाचे पुरातन मंदिर असून, येथील ग्रामस्थ अजूनपर्यंत पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरा तेवढ्याच श्रद्धेने जपत आहेत. कवठणी गावाचा राखणदार म्हणून या देवतेची ख्याती आहे. आपल्या भक्तांच्या हाकेला धावत येत त्यांची दुःखे दूर करून त्यांच्या सदैव पाठीशी उभा राहतो. जत्रेदिवशी गावात भक्तिमय वातावरण असते. मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. गाऱ्हाणे घालणे, नवस बोलणे व फेडणे आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात. श्री काजरोबा देवाचा जत्रोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com