टुडे पान एक अँकर-भारताचे ''संविधान'' देशाचा आत्मा
swt२७१४.jpg
२०२०५
सिंधुदुर्गनगरी ः सशस्त्र सेना ध्वजदिनच्या निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचा पालकमंत्री नितेश राणे यांनी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.
swt२७१५.jpg
२०२०६
सिंधुदुर्गनगरी ः न्यू इंग्लिश स्कूल सिंधुदुर्गनगरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत कवायतीच्या माध्यमातून सादर केले.
भारताचे ‘संविधान’ देशाचा आत्मा
पालकमंत्री नितेश राणेः सिंधुदुर्गनगरीत मुख्य ध्वजवंदन सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ ः संविधानामुळे भारतातील नागरिकांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये मिळाली. भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून देशाचा आत्मा आहे. सर्व नागरिक समान असल्याचा संदेश यामधून देण्यात आला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात केले.
सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस परेड मैदानावर पालकमंत्री राणे यांच्या हस्ते जिल्ह्याचा मुख्य ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते. यावेळी मंत्री राणे म्हणाले, ‘‘प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. कायद्याचे पालन करणे, जात-धर्म विसरून माणुसकी जपणे, स्त्री-पुरुष समानता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि देशाची एकता टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला. जिल्ह्यात ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून गावांचा विकास घडतो. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने निर्भयपणे व उत्साहाने मतदान करावे.’’
सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ च्या निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आले. २००२ मध्ये उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झालेले डॉ. मोहन दहिकर यांनी दीर्घ, निष्ठावान आणि कर्तृत्ववान सेवेद्वारे पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकारकडून राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने पालकमंत्री राणे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेचा विद्यार्थी सार्जंट अनंत चिंचकर, आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली विद्यानिकेतन या प्रशालेचे विद्यार्थी सार्जंट संस्कार सुशांत धुरी व मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट आणि ज्यू, कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स व्होकेशनल अॅण्ड सायन्स फोंडाघाट या प्रशालेची विद्यार्थीनी मनस्या फाले यांनी २०२५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय थल सैनिक शिबीरामध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर रायफल शुटींगमध्ये सुवर्णपदक मिळवून तसेच नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढवून मुख्यमंत्री शिष्यवृत्ती मिळवल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सार्जंट अनंत चिंचकर, संस्कार धुरी, मनस्या फाले या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रशिक्षक म्हणून गोपाळ गवस (एनसी एसआय अधिकारी प्रशिक्षक फर्स्ट ऑफिसर), आर्या भोगले (एनसीसी अधिकारी प्रशिक्षक सेकंड ऑफिसर), निखिल तेली (एनसीसी अधिकारी प्रशिक्षक) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल ओरोस, सिंधुदुर्गनगरी या शाळेतील १५० विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतांवर सामुहिक कवायतीचे सादरीकरण केले. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने दहशतवादी हल्लाविषयी प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

