आरोग्य, शस्त्रक्रिया शिबिरास सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद
swt2720.jpg
20229
सावंतवाडी ः आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर, अजय गोंदावळे व इतर मान्यवर.
आरोग्य, शस्त्रक्रिया शिबिरास
सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः अथायू युरो केअर कोल्हापूर व युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर यांच्यावतीने येथे आयोजित मूत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांच्या उपस्थित या शिबिराचा प्रारंभ झाला.
शेकडो जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यात शिबिरात मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, पाठीतून पोटात दुखणे, लघवीतून रक्तस्त्राव, वारंवार लघवी, मूत्रमार्गातील अडथळा, पुरुष वंध्यत्व, पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर तपासणी व समुपदेशन करण्यात आले. येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये शिबिर पार पडले. उद्घाटनप्रसंगी नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, डॉ. अक्षय साळुंखे, डॉ. राकेश पाटील, डॉ. योगेश जाधव, डॉ. सत्यशिल रुपनवर, गौरांग चिटणीस, शिवसेना उपशहरप्रमुख सुप्रिता धारणकर, सुलोचना गावडे, प्रसाद देऊलकर, ॲड. प्रसाद नाटेकर, अनिकेत पाटणकर, वसंत सावंत, अभिजित गवस, संदीप निवळे, ॲड. प्रथमेश प्रभू, देवेश पडते, नंदू कोरगावकर आदी उपस्थित होते. युवा रक्तदाता संघटनेचे सचिव विनायक गावस यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

