वरवेली रांजाणेवाडी परिसरात भीषण वणवा
- rat२७p२६.jpg-
२६O२०२३१
गुहागर ः तालुक्यातील वरवेली रांजाणेवाडी परिसरातील वणवा.
-----
वरवेली रांजाणेवाडी परिसरात वणवा
सतर्कतेमुळे अनर्थ टळला; फळबागांचे किरकोळ नुकसान
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ : तालुक्यातील वरवेली रांजाणेवाडी परिसरातील दगड खाणीजवळ असलेल्या रांजाणे बाऊल भागात रविवारी (ता. २५) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण वणवा पेटला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते; मात्र पोलिस प्रशासन आणि रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर (आरजीपीपीएल) कंपनीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्याने फळबागांचे होणारे मोठे नुकसान टळले आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, रविवारी (ता. २५) दुपारी रांजाणे बाऊल परिसरात अचानक धूर दिसू लागला. जवळच असलेल्या विवेक पवार यांच्या चिरेखाणीवरील व्यवस्थापक सुरेश गोरिवले यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले; परंतु, दुपारची वेळ आणि सोसाट्याचा वारा यामुळे वणवा वेगाने डोंगरमाथ्याकडे पसरू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या घटनेची माहिती तत्काळ गावचे सरपंच नारायण आगरे व पोलिस पाटील सुजित शिंदे यांना देण्यात आली. शिंदे यांनी घटनेची दाहकता गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांना कळवली. सावंत यांनी तत्परता दाखवत अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संपर्क साधला आणि अग्निशमन दलाची गाडी पाचारण केली. अवघ्या काही वेळातच कंपनीचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले; मात्र, ज्या दुर्गम भागात वणवा लागला होता तिथे गाडी जाणे अशक्य होते. अशा कठीण परिस्थितीतही केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबलाच्या जवानांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
----
कारण गुलदस्त्यात
आगीमुळे शेतकऱ्यांची फळझाडे आणि शेतीसाठी राखून ठेवलेल्या गवताचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे; मात्र, आग वेळीच आटोक्यात आली नसती तर संपूर्ण परिसरातील बागा भस्मसात झाल्या असत्या. या मोहिमेवेळी सरपंच नारायण आगरे, पोलिस पाटील सुजित शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार, कोतवाल पंकज आगरे, सुरेश गोरिवले यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. भरदुपारी हा वणवा नेमका कशामुळे लागला किंवा कोणी लावला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

