सोनुर्लीतील जीर्ण पूलप्रश्नी उपोषण

सोनुर्लीतील जीर्ण पूलप्रश्नी उपोषण

Published on

swt2725.jpg
20244
सावंतवाडी ः येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरात सोनुर्ली-निगुडे मार्गावरील जीर्ण मोरी प्रश्नी उपसरपंच भरत गावकर यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण छेडले.

सोनुर्लीतील जीर्ण पूलप्रश्नी उपोषण
उपसरपंच गावकरांसह ग्रामस्थ आक्रमक; बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनअंती माघार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः सोनुर्ली-निगुडे या मुख्य रस्त्यावरील जिर्ण झालेल्या मोरी पुलाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विरोधात प्रजासत्ताक दिनी उपसरपंच भरत गावकर यांनी उपोषण छेडले. पुलाचे काम प्रमुख जिल्हामार्ग यादीमध्ये प्राधान्याने घेऊन मंजूरीसाठी पाठविण्यात येईल, असे लेखी पत्र उपअभियंता अजित पाटील यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान, येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी न लागल्यास प्रंसगी रस्त्यावर उतरुन आत्मदहनासारखा मार्ग हाती घेऊ, असा इशाराही उपस्थित ग्रामस्थ व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.
सोनुर्ली-निगुडे या मुख्य रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील मोरी पूल पूर्णतः जीर्ण झाली आहे. यावर्षीच्या पावसात ती वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षी या पुलाची संरक्षण भिंत कोसळली होती. त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम बांधकाम विभागाने केले. परंतु, पुल नव्याने उभारण्याची वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हे पूल कोसळून रस्ता बंद झाल्यास सोनुर्ली गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कारण गावातील शेतकऱ्यांची शेत जमीन पुलाच्या पलीकडे असल्याने ते जाण्या-येण्यासाठी हा रस्ता एकमेव मार्ग आहे. त्यामुळे हे पुल नव्याने बांधा, अशी मागणी उपसरपंच गावकर हे गेल्या दोन वर्षापासून करत आहेत. मात्र, बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे श्री. गावकर यांनी ग्रामस्थांसोबत प्रजासत्ताक दिनी बांधकाम विभागाविरोधात उपोषण छेडले. यात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाठिंबा देत सहभाग दर्शविला.
यावेळी उपोषणस्थळी बांधकाम विभागाचे सावंतवाडी उप अभियंता अजित पाटील यांनी भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, लेखी आणि ठोस उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका श्री. गावकर यांनी घेतली. यावेळी रेश्मा सावंत, विक्रांत सावंत, सचिन बिर्जे, अजय सावंत, अमित परब, जितेंद्र गावकर, दिनेश सावंत, शांताराम गावडे आदींनीही उपोषणाला पाठिंबा दर्शवला.
दरम्यान, श्री. पाटील यांनी येत्या मार्चमध्ये मंजुरीसाठी पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावात प्रमुख जिल्हा मार्ग यादीत प्राधान्याने या पुलाच्या कामाचे नाव घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर श्री. गावकर यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी न लागल्यास प्रंसगी रस्त्यावर उतरुन आत्मदहनासारखा मार्ग हाती घेऊ, असा इशारा उपस्थित ग्रामस्थ व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com