श्रीराम पवारला सुवर्ण
भूगोल प्रज्ञाशोधमध्ये
श्रीराम पवारला सुवर्ण
सावर्डे ः नवी मुंबई येथील भूगोल अभ्यास व परीक्षा केंद्राच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या श्रीराम पवार याने सुवर्णपदक, आदिती शेंडगे हिने रौप्य तर आर्या मस्के हिने कास्यपदक मिळवले. भूगोल विषयाच्या शिक्षिका अपर्णा डिके यांना त्यांच्या उपक्रमशील कार्याबद्दल उपक्रमशील भूगोल शिक्षक हा सन्मान प्राप्त झाला आहे. सहावी ते दहावीतील १२२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. भूगोल हा विषय विविध स्पर्धा परीक्षांसह दैनंदिन जीवनातही अत्यंत उपयुक्त असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलची आवड वाढावी, या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
कसबा येथे
शंभूराज्याभिषेक उत्सव
संगमेश्वर ः माघ शुद्ध सप्तमीनिमित्ताने ३४५वा श्री शंभूराज्याभिषेक उत्सव कसबा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. भिडे गुरुजी यांच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कसबा स्मारक नित्यपूजन समिती तसेच ग्रामस्थांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी लांजा येथील जंगम गुरुजी यांच्या उपस्थितीत पवित्र सप्तनद्या, नवग्रह तसेच पंचायतन-शिवशक्ती यांचे आवाहन करून विधीवत शंभूराज्याभिषेक करण्यात आला. पारंपरिक विधी आणि मंत्रोच्चारांमुळे परिसर भक्तिमय झाला. अभिषेकानंतर ढोलताशांच्या गजरात आणि ''हर हर महादेव''च्या जयघोषात श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने संपूर्ण कसबानगरी दुमदुमून गेली आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या कार्यक्रमात कसबा ग्रामस्थांसह संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यातील अनेक धारकरी उपस्थित होते. हा उत्सव केवळ आनंदाचा सोहळा नसून, संगमेश्वर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या शुद्ध विचारांची बीजे पेरणारा आणि कसबा येथील धर्मवीर स्मारकात गेल्या दोन वर्षांपासून नियमित सुरू असलेल्या नित्यपूजन अधिष्ठानाचा संदेश घराघरात पोहोचवणारा उपक्रम असल्याची भावना प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी व्यक्त केली.
चित्रकला स्पर्धेत
‘एलटीटी’चे यश
खेड : येथील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचालित एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांनी २६ जानेवारी रोजी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. कोकणी मुस्लिम संघ यांच्यावतीने आयोजित तारे जमीन पर या स्पर्धेत ९वीतील आलिया परकार, ७वीतील मंजिरी भाट, ४थीतील मोहम्मद गझाली आणि ३रीतील मारवा कडवेकर या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. या संस्थेचे अध्यक्ष अहमद मुकादम, परवेज मुकादम, माजिद खतीब, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेने, विलीन पाटणे, समन्वयक जॉय, एल्सी जॉय, मुख्याध्यापक सारंग व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

