फिलिपाईन्समध्ये साजरा केला प्रजासत्ताक दिन
rat२७p२८.jpg-
P२६O२०२३५
फिलिपाईन्स येथील प्रदेश दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन साजरा केला.
फिलिपाईन्समध्ये प्रजासत्ताक दिन
पावस : महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित परदेश अभ्यास दौऱ्यावर असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी फिलिपाईन्स येथे भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या या शेतकऱ्यांनी परदेशातील भूमीवर राष्ट्रध्वज फडकावून ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. या दौऱ्यात रत्नागिरीतील प्रसन्न गवंडे, अजय तेंडुलकर या दोन शेतकऱ्यांचा सहभाग आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार, कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान शिकण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांची निवड परदेश दौऱ्यासाठी करण्यात आली आहे. यामध्ये मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांच्या अभ्यासासाठी एकूण १५ प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिनिधींचाही गौरवपूर्ण समावेश आहे. या दौऱ्यात लक्ष्मी मोरे, राजश्री बरबडे, प्रफुल्ल पाटील, कृष्णराव देशट्टीवर, कुलदीप खोत, किशोर कदम, अविनाश यावले, भाऊसाहेब जाधव, मुकुंद पाटील, विकास कराळे, विजय सुर्वे, प्रसन्न गवंडे, अजय तेंडुलकर, चंद्रकांत सूर्यवंशी आणि प्रणव नाडकर्णी या शेतकऱ्यांचा सहभाग आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

