लवेल येथील घरडा महाविद्यालयात एचआर कॉन्क्लेव्ह
- ratchl२७१.jpg ः
२६O२०२८२
चिपळूण ः घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील झालेली परिषद.
घरडा महाविद्यालयात ‘एचआर कॉन्क्लेव्ह’
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज अभियंते घडवताना उद्योगजगत आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक दृढ होणे काळाची गरज आहे, असे खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘एचआर कॉन्क्लेव्ह’ परिषदेत सर्वानुमते ठरवण्यात आले. उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ आणि शिक्षणक्षेत्रातील मान्यवर यांच्यात या विषयावर सखोल विचारमंथन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर ताठरे यांनी प्रास्ताविक करताना या उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि त्यातून अपेक्षित असलेल्या निकालांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञान न देता त्यांना उद्योगसज्ज बनवण्यासाठी कौशल्याधारित आणि परिणामाभिमुख उपक्रम राबवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. प्रमुख पाहुणे डॉ. ए. बी. मराठे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उद्योग-शिक्षणसंस्था यांच्यातील सुसंगतीवर विशेष भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बहुविषयक शिक्षण, कौशल्य विकास आणि इंडस्ट्री-ओरिएंटेड अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी उद्योगांच्या गरजांशी अधिक सुसंगत ठरतील, असे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

