श्रुती रेडकर यांचा दिल्लीत सन्मान

श्रुती रेडकर यांचा दिल्लीत सन्मान

Published on

श्रुती रेडकर यांचा दिल्लीत सन्मान
सावंतवाडीः कॉयर क्षेत्रात कार्यरत असलेल्या व विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लघू उद्योजकांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी यांच्या हस्ते व एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजी यांच्या विशेष उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील मळगाव येथील समर्थ कॉयर इंडस्ट्रीच्या उद्योजिका श्रुती रेडकर यांना विशेष सन्मानित करण्यात आले. सौ. रेडकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या वतीने कॉयर क्षेत्रातील वाटचाल विशद केली. यावेळी कॉयर बोर्डचे चेअरमन विपुल गोयल, सहसंचालक डॉ. षणमुगासुंदरम, जनसंपर्क अधिकारी तंकचन, विकास अधिकारी (इंडस्ट्रीज) सुरेश कुमार, प्रादेशिक कार्यालय प्रमुख श्रीनावास बिटलिंगू आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com