-राजापूर पालिकेने पटकावला सेवाकर्मी पुरस्कार

-राजापूर पालिकेने पटकावला सेवाकर्मी पुरस्कार

Published on

काही सुखद--------लोगो


-rat२७p२१.jpg-
२६O२०२२४
राजापूर ः पत्रकार परिषदेत माहिती देताना नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार.
-----------

राजापूर पालिकेला ‘सेवाकर्मी’ पुरस्कार
नगराध्यक्ष खलिफे ः दीडशे दिवसांचा विशेष उपक्रम, राज्यात सहावा क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ ः महाराष्ट्र शासनातर्फे सामान्य प्रशासनांतर्गंत दीडशे दिवसांचा विशेष कामकाज उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये राजापूर पालिकेने गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासकीय कारभार करत राज्यामध्ये सहावा क्रमांक पटकावत ‘सेवाकर्मी पुरस्कारा’वर आपल्या यशाची मोहोर उमटवली. अपुरा कर्मचारीवर्ग असतानाही ऑनलाईन सेवा, आस्थापना सेवा बाबी आणि ई-गव्हनर्सविषयक उत्कृष्ट कामगिरी करत राजापूर नगरपालिकेने मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरपैकी शंभर गुण मिळवत यश संपादन केल्याची माहिती नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी दिली.
नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे यांच्या नगरपालिकेमध्ये आज झालेल्या या पत्रकार परिषदेला बांधकाम सभापती सुबोध पवार, नगरसेवक सिद्धांत जाधव, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, दिवाकर खडपे, संदेश जाधव आदी उपस्थित होते.
दीडशे दिवसांच्या विशेष कामकाज उपक्रमामध्ये राजापूर नगरपालिकेने गतिमान प्रशासकीय कारभार केल्याची माहिती मुख्याधिकारी कुंभार यांनी दिली. यामध्ये ऑनलाईन तक्रारींचा शंभर टक्के निपटारा, जन्म-मृत्यू दाखले वितरण, विविध एनओसी, घरपट्टी वसुली, पालिकेचा आकृतिबंध तयार करणे, ऑनलाईन सर्व्हिस कामकाज, सेवापुस्तके अपडेट करणे, आस्थापना सेवा, ई-गव्हनर्स आदी विभागांमध्ये लक्षवेधी कामगिरी केल्याचे कुंभार यांनी या वेळी स्पष्ट केले. यामध्ये आपल्यासह कार्यालयीन अधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना लिपिक अनुष्का जुवेकर, संगणक अभियंता गायत्री लिमये यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
-------------
कोट
गतिमान प्रशासकीय कारभार करण्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध असणे गरजेचे असते; मात्र, राजापूर नगरपालिकेमध्ये विविध प्रकारची तब्बल ६६ टक्के पदे रिक्त आहेत. असे असतानाही सामान्य प्रशासनातर्गंत राजापूर नगरपालिकेने गतिमान प्रशासकीय कारभार करत राज्यामध्ये सहावा क्रमांक मिळवत ‘सेवाकर्मी पुरस्कार’ पटकावला आहे.

-अभिजित कुंभार, मुख्याधिकारी राजापूर नगरपालिका

''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com