मंडणगडमध्ये योगेश कदमांना आघाड्यांचे आव्हान

मंडणगडमध्ये योगेश कदमांना आघाड्यांचे आव्हान

Published on

-rat28p9.jpg-
26O20501
मंडणगड तालुका नकाशा
----------
मंडणगड तालुका वार्तापत्र... लोगो

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवार निश्चितीनंतर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, यावेळी पक्षीय आघाड्यांची गणिते, स्थानिक नेतृत्वाची प्रतिष्ठा आणि तालुक्यावरचे वर्चस्व या मुद्द्यांभोवती निवडणूक रंगणार आहे. खऱ्या अर्थाने मंडणगडमध्ये राज्यमंत्री योगेश कदमांच्या शिवसेनेपुढे एकत्रित आलेल्या नव्या आघाड्यांनी आव्हान उभे केले आहे.

सचिन माळी, मंडणगड
--------
योगेश कदम यांना आघाड्यांचे आव्हान
मंडणगडात सत्तासंघर्ष तीव्र ; रोजगार व समाजधारित राजकारण
---
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबाठा) आणि मनसे यांनी एकत्रित आघाडी उभारली आहे. काँग्रेस आणि भाजपने देखील दोन जागांवर आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तसेच बसपा आणि वंचित बहुजन आघाडीही संयुक्तपणे मैदानात उतरली आहे. त्यामुळे यावेळी लढत केवळ पक्षांमध्ये नसून आघाड्याविरुद्ध एकला चलो रे अशी स्पष्ट रेषा उमटली आहे.
उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रचारात रोजगारनिर्मिती, भौतिक विकास, स्थानिक प्रश्न तसेच समाजाधारित राजकारण हे प्रमुख मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, युवकांचे स्थलांतर आणि महिलांचा सहभाग हे मुद्दे मतदारांवर प्रभाव टाकतील, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.
जिल्हा परिषद बाणकोट गटात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात प्रमुख लढत होत आहे. भिंगळोली गटात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उबाठा अशी थेट राजकीय टक्कर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने येथे सर्वसाधारण आरक्षणातून महिला उमेदवार देत वेगळे राजकीय समीकरण उभे केले आहे. दोन्ही गटात तीन माजी जिल्हा परिषद सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उबाठा आघाडी असा त्रिकोणी संघर्ष निर्माण झाला आहे. इस्लामपूर गणात माजी सभापतीना आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटातून थेट आव्हान देण्यात आले असून हा मतदारसंघ लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
------
चौकट
कदम-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
एकंदरीत या निवडणुकीत मंडणगड तालुका हा स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अस्तित्वासोबत राज्यमंत्री योगेश कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांचे हे होम ग्राउंड असल्याने निकालातून तालुक्यावर नेमके कोणाचे वर्चस्व आहे, हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक निकालानंतर केवळ स्थानिक सत्तासमीकरणच नव्हे, तर आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा जनादेश मंडणगडमधून मिळणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या तालुक्याकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com