कार्यकर्त्यांशी नाते जपलेला नेता हरवला

कार्यकर्त्यांशी नाते जपलेला नेता हरवला

Published on

swt2824.jpg

मालवण ः राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ येत पाहणी केली होती. यावेळी त्यांच्यासोबत अबिद नाईक उपस्थित होते. (संग्रहीत छायाचित्र)

कार्यकर्त्यांशी नाते
जपलेला नेता हरवला
सिंधुदुर्गातील राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी अजित पवार यांचे जवळचे नाते होते. त्‍यामुळे आपल्‍या घरातील माणूस गेल्‍याचे मोठे दु:ख आहे. सिंधुदुर्गातील कुठल्याही प्रश्नासाठी फोन केला तर ते लगेच फोन उचलत. एवढंच नव्हे तर तो प्रश्‍न निकाली काढण्यासाठी तातडीने ते प्रशासनाला निर्देश देत असंत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्यावेळी मी त्यांना फोन करून आता पुढे काय करूया, अशी विचारणा केली होती. त्‍यानंतर काही तासातच त्यांनी थेट राजकोट किल्‍ला येथे येऊन पुतळ्याची पाहणी केली होती. एवढेच नव्हे तर नवीन पुतळा उभारणीसाठी बजेटमध्ये तरतूद देखील केली होती. सिंधुदुर्गच्या विकास कामांना निधी मिळण्याबाबत त्यांनी कधी कमतरता भासू दिली नाही. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेहमी सन्मानाची वागणूक त्यांनी दिली. आजच्या या घटनेनंतर आमच्यावर, जिल्‍हावासीयांवर फार कठीण प्रसंग ओढवला आहे.
- अबिद नाईक, सिंधुदुर्ग जिल्‍हाध्यक्ष, राष्‍ट्रवादी
शब्दांकन ः राजेश सरकारे
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com