अजित दादा पानासाठी
- rat२८p२.jpg-
२६O२०४८०
खेड ः कोरोना काळात खेड येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी उद्योजक कौस्तुभ बुटाला
- rat२८p३.jpg-
२६O२०४८१
खेड ः आयसीएस महाविद्यालयात सहजीवन शिक्षण संस्थेचे (कै.) हिराभाई बुटाला, कौस्तुभ बुटाला यांच्यासह चर्चा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
---------
खेडवासीयांची ती शेवटचीच भेट!
खेड ः तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या प्रचारासाठी अनेक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांनी अनेक वेळा खेड तालुक्याचा दौरा केला होता. खेड तालुक्याशी त्यांचे जवळचे ऋणानुबंध होते.
कोरोना काळात माणसाचा जीव वाचविण्यासाठी करोडो रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला होता. खेड शहरातील खेड नगरपालिकेच्या दवाखान्यात कोविड सेंटर उभारणे यासह अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला होता. खेड येथील उद्योजक कौस्तुभ बुटाला यांच्या मातोश्रीच्या नावाने त्यांनी खेड नगरपालिका दवाखान्यांतर्गत (कै.) उषाताई बुटाला कोविड केअर सेंटर उभे केले होते. त्याच्या उद्घाटनासाठी अजित पवार आले होते. ही त्यांची खेड तालुक्याला दिलेली शेवटची भेट ठरली आहे. त्यावेळी त्यांनी या कोविड सेंटरमध्ये विविध साहित्य देखील उपलब्ध करून दिले होते. कोरोना काळात प्रत्येकाने आपापली काळजी घ्या यासाठी त्यांनी त्यांच्या जाहीर सभेतून आवाहन करत कोरोना काळातील नियम पाळा आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असे सांगितले होते. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, बाबाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
----
कोट १
अजित पवार यांची काम करण्याची पद्धत आणि उत्कृष्ट निर्णयक्षमता, राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला होता. या कार्यतत्पर नेत्याला आज सर्वजण मुकले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
- बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
-----
कोट २
अजित पवार आणि माझे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वेळा त्यांची निर्णय क्षमता पाहून आमच्यासारख्या युवकांना एक प्रेरणा मिळायची. आम्हा युवा कार्यकर्त्यांचा एक आधारस्तंभ निखळला आहे.
- अजय बिरवटकर, राष्ट्रवादी काँग्रेस
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

