असा नेता होणे नाही

असा नेता होणे नाही

Published on

swt2826.jpg
20527
देवगड ः येथे नंदकुमार घाटे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात अजित पवार सहभागी झाले होते.


असा नेता होणे नाही
- नंदकुमार घाटे, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी (शरद पवार गट)

माजी मुख्यमंत्री शरद पवार कुटुंबियांशी गेली अनेक वर्षे आपले कौटुंबिक संबध आहेत. तत्कालीन एक संघ काँग्रेस असल्यापासून पवार कुटुंबियांसोबत राजकीय नाते जुळले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर सिंधुदुर्गची राजकीय वाटचाल शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी विस्तारलेली राजकीय ओळख आजपर्यंत कायम होती. अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक विकासात्मक प्रश्‍न सोडवले गेले. तत्कालीन राज्य सरकारमध्ये अजित पवार जलसंपदामंत्री असताना देवगड-जामसंडे नळपाणी योजनेच्या दहिबांव येथील उद्भवाजवळील अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्यासाठी त्यांना कळवले आणि अवघ्या तीन दिवसात सर्व यंत्रणा जाग्यावर पोचून गाळ काढला गेला. त्यांच्याच सहकार्याने सिध्दीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाळा आणि अन्य कामांकरिता विकास निधी त्यांनी तालुक्यासाठी उपलब्ध करून दिला.
पवार कुटुंबियांमुळे कृषी, सहकार क्षेत्रात भरीव काम करता आले. त्यांच्या आदेशावरून राजकीय क्षेत्रात वाटचाल करता आली. पवार कुटुंबियांशी आपले केवळ राजकीय संबधच नव्हते तर आमचे एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते होते. माझ्या मुलांच्या लग्नावेळी शरद पवार यांच्या सांगण्यावरून तत्कालीन मंत्री पदावर असलेले अजित पवार देवगडमध्ये खास उपस्थित होते. इतकेच काय, 2025 मध्ये माझ्या पत्नीचे निधन झाले, त्यावेळीही शरद पवार यांनी संपर्क साधून विचारपूस केली होती. शरद पवार यांच्याप्रमाणेच अजित पवार देखील माझ्या थेट संपर्कात असत. कोणतेही विकासकाम सांगावे किंवा निवेदन पाठवल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही होत होती. पक्षाच्या विभाजनानंतरही मी शरद पवार यांच्यासोबत आहे हे माहित असूनही अजित पवार आपल्याशी संपर्क ठेवून होते. त्यांच्यामुळे स्थानिक विकासामध्ये मदत झाली. आजही पवार कुटुंबाशी संबध कायम आहेत. आज अचानक त्यांच्या निधनाची दुदैवी बातमी आली आणि मन खिन्न झाले. आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून घरीच थांबणे पसंत केले. असा राजकीय नेता पुन्हा होणे नाही.

शब्दांकन ः संतोष कुळकर्णी
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com