''बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन''
''बिबट्याचा बंदोबस्त
न केल्यास आंदोलन''
बांदाः शेर्ले, निगुडे, रोणापाल येथे काही दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने स्थानिकांत तसेच शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वेळोवेळी कल्पना देऊनही वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने लवकरच जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शेर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते गौरांग शेर्लेकर यांनी दिला आहे. गेले काही दिवस शेर्ले परिसरात बिबट्याचा वावर आहे. काही दिवस पाळीव जनावरांवर हल्ला होण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे वनविभाग मोठा अपघात होण्याची वाट बघत आहे का, असा सवाल शेर्लेकर यांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
...................
असलदेतील शिबिरात
३० जणांचे रक्तदान
नांदगाव ः प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिविजा वृद्धाश्रमात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. यावर्षीचे ध्वजवंदन सुपरवाइजर उज्ज्वला लोके यांनी केले. सर्व आजी-आजोबांनी राष्ट्रगीत व झेंडागीत म्हणून सलामी दिली. आश्रमचे सचिव संदेश शेट्ये यांनी एस.एस.पी.एम हॉस्पिटल पडवेच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सायंकाळी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त कर्मचाऱ्यांनी भजन केले. आजी-आजोबांनी गाणी म्हणून मनोरंजन केले. विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ झाला. केक बनवण्याच्या स्पर्धेमध्ये सायली तांबे, अमृता इंदप, सानिया इंदप यांनी प्रथम तीन तर उत्तेजनार्थ क्रमांक मंजिरी राणे, उज्ज्वला लोके यांनी मिळविला. उकडीचे मोदक बनवणेमध्ये मंजिरी राणे, सानिया इंदप, अस्मी राणे, उत्तेजनार्थ सायली तांबे, केतकी पेडणेकर यांनी यश मिळविले. अल्पोपहार पदार्थ स्पर्धेत सायली तांबे, सानिया इंदप, मंजिरी राणे, उत्तेजनार्थ अनुजा आचरेकर, सुगंधा राणे यांनी क्रमांक मिळवले. दिंडी भजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
........................
समर्थ पादुका पालखीचे
बांद्यात आज आगमन
बांदा ः अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे उद्या (ता. २९) येथे आगमन होणार आहे. सकाळी ८.३० वाजता येथील श्री विठ्ठल मंदिरात पालखीचे आगमन होईल. त्यानंतर पादुका पूजन व महाआरती, ११ वाजेपर्यंत पालखीचे भाविकांना दर्शन व त्यानंतर पालखीचे पुढे प्रस्थान होईल. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन स्वामीभक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.
..........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

