अजिदादा पानासाठी
rat२८p१०.jpg-
२६O२०५०८
रत्नागिरी- टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्य वर्धन केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे आदी.
rat२८p११.jpg-
२६O२०५०९
थिबा पॅलेस येथील राज्यातील पहिल्या थ्रीडी मल्टिमिडीया शो पाहण्यासाठी आल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.
-------
रत्नागिरीच्या विकासाचा ‘सारथी’
कोकणासाठी भरीव निधी ; मिऱ्या बंधारा ते कौशल्य केंद्र अनेक स्मृतींना उजाळा
रत्नागिरी : विमान अपघातात मृत्यू झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून रत्नागिरीला भरभरून निधी दिला. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी त्यांनी सुमारे पावणे दोनशे कोटींचा भरीव निधी दिला. मिऱ्यावासीयांचे समुद्रापासून संरक्षण झाले. अजित पवार यांचे कोकणावर विशेष प्रेम असल्याने ते वारंवार कोकणात येत होते. परंतु १७ मार्च २०२५ चा या ‘दादा’ माणसाचा दौरा अखेरचा ठरला. त्यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी आणि टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन केले. राज्यातील पहिल्या मल्टीमिडिया थ्रीडी शोचा आनंद घेतला. त्यांच्या जाण्याने रत्नागिरीचा विकासाचा सारथी हरपला असेच म्हणावे लागले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि कणखर नेतृत्व अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रासह कोकणच्या विकास प्रक्रियेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी अर्थमंत्री म्हणून दिलेले योगदान आणि त्यांचे या भूमीशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जिल्हावासीयांच्या सदैव स्मरणात राहील. रत्नागिरीतील मिऱ्या बंदर परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून समुद्राच्या उग्र रूपामुळे धास्तावलेले होते. समुद्राच्या उधाणामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन लोकांच्या जमिनी, अगदी सात-बारावरील नोंदीही समुद्रात वाहून जात होत्या. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न अजित पवार यांनी आपल्या कार्यपद्धतीनुसार मार्गी लावला. आज या बंधाऱ्यामुळे मिऱ्यावासीयांच्या घरांचे आणि जमिनींचे समुद्रापासून कायमचे संरक्षण झाले आहे.
१७ मार्च २०२५ रोजीच्या रत्नागिरीतील अखेरच्या दौऱ्यात त्यांनी प्रत्यक्षात जमिनीवर उतरून शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे निर्माण आणि विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले.
-----------
चौकट...
कोकणाशी अतूट नाते
कोकणच्या विकासकामात त्यांनी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. शब्दाचा पक्का नेता म्हणून त्यांनी रत्नागिरीच्या प्रलंबित प्रकल्पांना गती दिली. १७ मार्चच्या त्या अखेरच्या भेटीत त्यांनी दिलेली आश्वासने आणि केलेली कामाची पाहणी आज आठवणींच्या रूपाने रत्नागिरीकरांच्या मनात जिवंत आहे. विकासकामांच्या माध्यमातून अजित पवार यांनी रत्नागिरीच्या किनारपट्टीवर उमटवलेला ठसा कधीही पुसला जाणार नाही.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

