वडीलधारी नेतृत्व
swt2827.jpg
20534
प्रफुल्ल सुद्रिक
वडीलधारी नेतृत्व
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझे वडील गेल्यानंतर मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता, वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले. दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते. त्यामुळे अजूनही असं वाटतंय की, आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, ''प्रफुल्ल वेळेवर ये बरं का,'' त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये. अजित दादा आमच्यासाठी पालक होते. त्यांच्यासोबत आम्ही सर्व कुटुंबियांनी घातलेला अमूल्य वेळ हा आमच्या सर्वच आठवणींना उजाळा देणारा आहे. दादांचे मार्गदर्शन हे नेहमी आमच्यासाठी फलश्रुतीदायक ठरले. एक वडीलधारी नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहिले. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कोणतेही प्रश्न असो ते तात्काळ सोडवण्याचे काम करणारे ते एकमेव नेतृत्व होते. आज त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. माझ्या या वडीलधाऱ्या नेतृत्वास आम्ही मुकलेलो आहोत. राजकीय क्षेत्रातील, राजकीय पटलातील एक आधारस्तंभ आज निखळला. त्यांच्या प्रती नतमस्तक होणे हीच आमची आदरांजली.
- प्रफुल्ल सुद्रिक, युवक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

