मधुमिलिंद संस्थेची ''प्रेम की यातना'' प्रथम
20424
मधुमिलिंद संस्थेची ''प्रेम की यातना'' प्रथम
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ः सांघिकसह वैयक्तिक तीन पारितोषिके
रत्नागिरी, ता. २८ ः लांजा तालुक्यातील माघी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीतील नव्याने उभारी घेणाऱ्या ‘मधुमिलिंद’ या संस्थेच्या ‘प्रेम की यातना’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकसह वैयक्तिक तीन पारितोषिक पटकावली.
गणेशोत्सवानिमित्त मंडळाने राज्यस्तरीय एकांकिकेका स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण १० एकांकिका सादर झाल्या होत्या. त्यामध्ये मधुमिलिंद या संस्थेच्या प्रेम की यातना या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. अक्षरसिंधू साहित्य कलामंचच्या (कणकवली) ''भरकाट'' या एकांकिकेने द्वितीय व सुमती थिएटर्स (रत्नागिरी) संस्थेच्या ''लज्जा द्यावी सोडून'' या एकांकीकेला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून मित्र संस्था शिरगावच्या ''आईतवार'' या एकांकिकेला देण्यात आला.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके अशी ः दिग्दर्शन ः शेखर मुळे (प्रेम की यातना), द्वितीय ः सुहास वरुणकर (भरकाट), उत्कृष्ट नेपथ्य- सुजल मोरे (आगीन फूल), मयूर चव्हाण (भरकाट), उत्कृष्ट संगीत- समिधा देवळेकर (कुबडा तू बडा), निखिल भुते (प्रेम की यातना), प्रकाशयोजना- सुहास वरुणकर, स्वप्नील गांधी (कुबडा तू बडा), उत्कृष्ट अभिनेता- दीपक माणगावकर (प्रेम की यातना), गजानन शेट्ये (कुबडा तू बडा), उत्कृष्ट अभिनेत्री- भाग्यश्री भोगटे (आईतवार), ऐश्वर्या बापट (लज्जा द्यावी सोडून), लक्षवेधी अभिनेता- प्रमोद तांबे (भरकाट), अभिनेत्री ः ऋतुजा काटकर (पॅडल).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

