दापोली कृषी विद्यापीठात मार्गदर्शन
20560
दापोली कृषी विद्यापीठात
महिला संरक्षणाबाबत मार्गदर्शन
रत्नागिरी, ता. २८ ः राज्य विधी सेवा प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांर्गत दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात मंगळवारी (ता. २७) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण या विषयावर मार्गदर्शन झाले.
हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व महिला कर्मचारी तसेच महिला व पुरुष शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा याबाबत माहिती दिली. लैंगिक छळ म्हणजे काय, कोणती कृत्ये लैंगिक छळाच्या व्याख्येत येतात, याविषयी त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्यास महिलांनी कोणती पावले उचलावीत, तक्रार कशी करावी, याबाबतही माहिती दिली. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण या विषयावर लैगिंक छळ तक्रार निवारण समितीची रचना, तिची कार्यपद्धती व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मार्गदर्शनानंतर उपस्थित विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांचे शंकांचे निरसन करण्यात आले. सचिव पाटील यांनी शंकांचे निरसन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

