वातावरणातील बदलाने मोठ्या प्रमाणावर फळगळ
- rat२८p२२.jpg-
२६O२०५७९
रत्नागिरी ः तालुक्यातील आंबा बागांमध्ये फळगळ सुरू आहे.
-rat२८p२३.jpg-
P२६O२०५८२
रत्नागिरी ः मोठ्या प्रमाणात आलेला मोहोर गळून गेला असून एखादी कैरी दिसून येत आहे.
---------
वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फळ गळ
उष्म्या अभावी फळांची वाढ घटली ; मोहोर वाचेल या आशेवर बागायतदार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : वातावरणातील बदलांचा विपरीत परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर होत असून यंदा उत्पादकांवर मोठे संकट ओढवले आहे. यंदा बागांमध्ये ९० टक्के मोहोर होता, पण थंडी नसल्याने फळधारणा झालेली नाही. त्यात ढगाळ वातावरण आणि कडाक्याची थंडी यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. उष्मा नसल्याने फळांची वाढही थांबली असून, यंदाचा हंगाम यथातथाच होण्याची भीती आहे. मागील मोहोर वाचेल या आशेवर बागायतदार आहेत.
यंदा उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, थंडीची प्रतीक्षा आणि आता अचानक वाढलेली उष्णता या त्रिसूत्रीचा हापूस उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम राहिल्याने आणि त्यानंतर थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यातच मागील काही दिवसांपासून तापमानात अचानक मोठी वाढ झाल्याने बागायतदारांच्या अडचणीत भर पडली आहे. ही उष्णता सहन न झाल्याने मोहोराचे रूपांतर फळात होण्यापूर्वीच तो गळून पडत आहे किंवा करपून जात आहे. याशिवाय नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे ‘तुडतुडा’ व ‘करपा’ यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
यंदा बागांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत मोहोर दिसून येत होता, मात्र पोषक थंडीअभावी फळधारणा (फ्रूट सेटिंग) होऊ शकली नाही. ढगाळ वातावरणामुळे थ्रिप्स आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढला असून, कडाक्याचा उष्मा नसल्याने फळांची वाढही खुंटली आहे. फळधारणा होण्यापूर्वीच मोहोर आणि लहान कैऱ्यांची प्रचंड गळ होत असल्याने यंदा उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. कीड नियंत्रणासाठी करावा लागणारा फवारणीचा अफाट खर्च आणि मिळणारे कमी उत्पादन यामुळे बागायतदार हतबल झाले आहेत. या परिस्थितीमुळे आंब्याचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता असून, सर्वसामान्य ग्राहकांना मे महिन्यापर्यंत चांगला आंबा मिळणे कठीण होणार आहे. वाढत्या हवामान बदलाचा अभ्यास करून प्रशासनाने आणि कृषी तज्ज्ञांनी यावर तातडीने उपाययोजना सुचवाव्यात आणि बागायतदारांना आधार द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
-----
कोट
यंदा बागांमध्ये प्रचंड प्रमाणात मोहोर होता, मात्र योग्य वेळी थंडी न पडल्यामुळे फळधारणा झाली नाही. सततच्या ढगाळ वातावरणामुळे थ्रिप्स आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढला असून त्याचा मोठा फटका बसला आहे. पुरेसा उष्मा नसल्यामुळे फळांची अपेक्षित वाढ झाली नाही. यंदाचा हंगाम यथातथाच होण्याची भीती असून, आता शेवटच्या टप्प्यातील जो काही मोहोर शिल्लक आहे, तो तरी वाचवता येईल का या आशेने आम्ही काम करीत आहोत.
- राजन कदम, आंबा बागायतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

