तळवडे इंग्लिश मिडिअमचे रेखाकला परीक्षेत यश
swt292.jpg
20660
तळवडे ः येथील इंग्लिश मिडिअमच्या यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.
तळवडे इंग्लिश मिडिअमचे
रेखाकला परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे या प्रशालेने शासकीय रेखा कला परीक्षेत यश संपादन केले. प्रशालेतील १२ विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री तर १४ विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परीक्षेत सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.
एलिमेंट्री परीक्षेत पराग परब व तन्मय पिकुळकर या विद्यार्थ्यांनी ''अ'' श्रेणी प्राप्त केली. हर्षदा परब हिने ''ब'' तर पार्थ सावंत-भोसले, पार्थ मसुरकर, मानवी म्हारव, प्रांजल जाधव, कृष्णा सावंत, गणेश परब, अस्मित परब, अनुज तारिहाळकर, तेजन परब, श्रेयस कुंभार, रेहान साळगावकर हे विद्यार्थी ''क '' श्रेणीत उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेत वेद चिंदरकर ''अ ''श्रेणीत उत्तीर्ण झाला असून प्रेरणा काजरेकर ''ब'' श्रेणीत उत्तीर्ण झाली. आर्यन परब, अनुष्का परब, महीका वजराटकर, निवेदिता राणे, सुयश लाड, खुशी माणगावकर, अन्वी गावडे, विघ्नेश परब, स्वरा दळवी व केतकी गावडे यांनी ''क'' श्रेणी प्राप्त केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर, उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

