सावंतवाडीत उद्या कवयित्री संमेलन

सावंतवाडीत उद्या कवयित्री संमेलन

Published on

सावंतवाडीत निमंत्रितांचे उद्या
विभागीय कवयित्री संमेलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था व सिंधुदुर्गातील कवी आरती प्रभू यांच्या स्मरणार्थ गेली ४३ वर्षे नियमितपणे सुरू असलेल्या आरती मासिकाच्या आयोजनाखाली, कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी व श्रीराम वाचन मंदिर यांच्या सहकार्याने १९ वे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन शनिवारी (ता.३१) आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.
संमेलन आयोजनासाठी ‘आरती’ च्या कार्यकारी संपादक ज्येष्ठ साहित्यिक उषा परब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला समिती गठीत केली आहे. या समितीत श्रीया भागवत, मेघना राऊळ, श्वेतल परब, प्रज्ञा मातोंडकर, प्रतिभा चव्हाण, स्मिता परब, ऋतुजा सावंत भोसले यांचा समावेश आहे. संमेलनासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील प्रथितयश कवयित्री तसेच सिंधुदुर्ग व सावंतवाडीतील निवडक कवयित्रींना आमंत्रित केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वसई येथील डॉ. पल्लवी बनसोडे या शब्दवेल प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. संमेलनाचे उद्घाटन गोव्यातील कवयित्री, पत्रकार, नाट्यकर्मी, मुलाखतकार, स्तंभलेखक कालिका बापट यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच निमंत्रितांमध्ये डॉ. चित्रा गोस्वामी(रत्नागिरी), डॉ. लता ऐवळे कदम (सांगली), पुजा दिवाण (कोल्हापूर), श्रृती हजारे ( गोवा), सरिता पवार- कणकवली, डॉ. सई लळीत- ओरोस, मिनाक्षी अळवणी- बांदा, मनिषा पाटील- कणकवली, ॲड. अंजली मुतालिक- कुडाळ, आर्या बागवे- मालवण व सावंतवाडी तील प्रा. शालिनी मोहळ, मंगल नाईक जोशी, मृण्मयी पोकळे, तन्वी परब, आदिती मसुरकर, सारिका पाटील या कवयित्रींचा समावेश आहे. या संमेलनात सावंतवाडीतील ज्येष्ठ नागरिक महिला संघ सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग गोवा मर्यादित नवोदित काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे. काव्यरसिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, संपादक प्रभाकर भागवत, सहसंपादक भरत गावडे, विठ्ठल कदम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष दीपक पटेकर व श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com