दिव्यांग, ज्येष्ठांसाठी विशेष मार्ग

दिव्यांग, ज्येष्ठांसाठी विशेष मार्ग

Published on

.
rat२९p२८.jpg-
२६O२०७००
रत्नागिरी : भाट्ये किनाऱ्यावरून समुद्रापर्यंत जाण्याकरिता मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दिव्यांग, ज्येष्ठांसाठी विशेष मार्ग करण्यात आला आहे.
----
भाट्ये समुद्रकिनारी ज्येष्ठांसह दिव्यांना विशेष मार्ग
मुकुल माधव फाउंडेशनचा पुढाकार; एक दिवसीय सहलीचेही आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : शहराजवळील भाट्ये समुद्रकिनारा हा सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची अडचण लक्षात घेऊन फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यावतीने विशेष रबराचा वॉकवे (चालण्याचा मार्ग) बसवण्यात आला आहे. या मार्गामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाऊन पाण्याचा आनंद घेणे शक्य होणार आहे.
भाट्ये किनाऱ्यावर बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात; मात्र वाळूवरून त्यांना चालणे कठीण बनते. तसेच व्हीलचेअरसुद्धा नीट नेता येत नाही. त्यामुळे त्यांना समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही व त्यांना वाळूतला किंवा समुद्राच्या पाण्यातला आनंद लुटता येत नाही. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन गेली ३० वर्षे आरोग्य, शिक्षण, पर्यावरणपूरक, सामाजिक उपक्रम यामध्ये पूर्ण भारतात काम करत आहे. याच अनुषंगाने दिव्यांग विद्यार्थी, त्यांच्या पालकांसाठी भाट्ये बीचवर एक दिवसीय सहलीचे आयोजनही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध खेळ, उपक्रम आणि निसर्गानुभव यांचा मनमुराद आनंद घेतला. या सहलीला मुकुल माधव विद्यालय व फिनोलेक्स अॅकॅडमी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दिव्यांग मुलांना करमणुकीचाही आनंद दिला.
या कार्यक्रमाला भाट्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रीती भाटकर, ग्रामपंचायत सदस्य, सचिन सारोळकर, फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com