महात्मा गांधी, शास्त्रींच्या दुर्मिळ दस्ताऐवजांचे प्रदर्शन
rat२९p३०.jpg-
२६O२०७०२
रत्नागिरी : पुराभिलेख संचालनालय, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आयोजित दुर्मिळ दस्तऐवज प्रदर्शन पाहताना विद्यार्थिनी.
-----
दुर्मिळ कागदपत्रांनी वेधले विद्यार्थ्यांचे लक्ष
पुराभिलेखचे प्रदर्शन ; महात्मा गांधी-शास्त्रींच्या आठवणींचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित दुर्मिळ ऐतिहासिक पुराभिलेख, मूळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या विशेष प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला. दोन दिवसांच्या प्रदर्शनात सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिले.
सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढा, राष्ट्रउभारणी, लोकशाही मूल्ये तसेच राष्ट्रीय नेत्यांचे जीवनकार्य याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना पुराभिलेखांतून पाहता आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, अनुभवाधिष्ठित शिक्षण आणि इतिहास, मानव्यविद्या विषयांत प्रत्यक्ष साधनांद्वारे शिकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे प्रदर्शन खूपच उपयोगी ठरले. पुराभिलेख, मूळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनामुळे पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन इतिहासाशी थेट संवाद साधता आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी चिकित्सक विचार, संशोधनवृत्ती आणि राष्ट्रीय जाणीव विकसित होण्यास मदत होईल, असे मत डॉ. पंकज घाटे यांनी व्यक्त केले. इतिहास आणि संस्कृती जतन करणे हे पुराभिलेख संचालनालयाचे प्रमुख काम आहे. आजतागायत राजकीय, प्रशासनिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात ज्या ज्या सुधारणा झाल्या व या क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे समग्र दर्शन पुराभिलेख संचालनालय घडवते.
-----
कोट १
प्रदर्शनात ठेवलेली जुनी कागदपत्रे, हस्ताक्षरातील पत्रे मिळणे कठीण गोष्ट आहे; पण हे सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळाले. गुगल व एआय आले तरीही इतकी छान माहिती मिळणे सोपे नाही. पुराभिलेखामुळे ही माहिती मिळाली.
- प्रतीक आपटे
-----
कोट २
हे प्रदर्शन सुंदर, नीटनेटके, मांडणी उत्तम, चित्रेही आहेत. चिकित्सक विद्यार्थी, नागरिक, अभ्यासकांना या प्रदर्शनाचा उपयोग होणार आहे. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दलचे दस्तऐवज एकाच ठिकाणी पाहता आले.
- किरण धांडोरे, ग्रंथपाल, गोगटे महाविद्यालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

