

swt2913.jpg
20711
वारगाव ः येथील हायस्कूलमध्ये आयोजित शालेय क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाचा गौरव करताना मान्यवर.
वारगाव विद्यालयात
क्रिकेट स्पर्धा उत्साहात
तळेरे, ता. २९ ः वारगाव येथील माध्यमिक विद्यालयात शालेय स्तरावरील ओव्हरआर्म मर्यादित षटकांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत नववीच्या संघाने लीगमधील तिन्ही सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात दहावीच्या संघाचा पराभव करत नववीच्या संघाने (कै.) महादेव शेठ केसरकर क्रिकेट चषकावर आपले नाव कोरले.
संस्थापक अध्यक्ष महादेव शेठ केसरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत नववीतील कौशल्य गुंडये या अष्टपैलू खेळाडूने सर्व सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी करत चारही सामन्यांत ‘मॅन ऑफ द मॅच’ तसेच ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कार पटकावला. विजेत्या व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वारगाव विकास मंडळाचे अध्यक्ष विजय केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला मुख्याध्यापक हनुमंत वाळके, शिक्षकवृंद उपस्थित होते. पंच म्हणून माजी विद्यार्थ्यांनी काम पाहिले. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक उत्साह निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.