जिल्हा उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात

जिल्हा उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात

Published on

wt2915.jpg
20717
पुणे ः येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या कौटुंबिक स्नेहमेळाव्यात संगीत भजन स्पर्धेतील विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जिल्हा उत्कर्ष मंडळाचा
स्नेहमेळावा उत्साहात
तळेरे, ता. २९ ः सिंधुदुर्ग भवन, थेरगाव (पुणे) येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४८ वा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ८४ रक्तदात्यांनी सहभाग घेतला, तर संगीत भजन स्पर्धेत श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, काळेवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सकाळी सत्यनारायण महापूजेनंतर रक्तदान शिबिर व संगीत भजन स्पर्धेला सुरुवात झाली.
भजन स्पर्धेत एकूण ११ संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ (एमआयडीसी विभाग) तर तृतीय क्रमांक श्री पांचाळमय ब्रह्म सुतार समाज भजन मंडळ (पिंपरी-चिंचवड) यांनी मिळविला. उत्कृष्ट वादक व गायकांनाही पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी वैवाहिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण केलेल्या २१ दांपत्यांचा तसेच १५ सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. चंद्रकांत गायकवाड यांनी तर आभार रुपेश काणेकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com