रत्नागिरी ः रत्नागिरी एमआयडिसीच्या उपअभियंत्याची बनावट सही करून खोटी तक्रार

रत्नागिरी ः रत्नागिरी एमआयडिसीच्या उपअभियंत्याची बनावट सही करून खोटी तक्रार

Published on

‘एमआयडीसी’ उपअभियंत्याच्या
बनावट सहीने खोटी तक्रार

रत्नागिरीतील प्रकार; अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता भास्करराव निवृत्ती पाटील यांची बनावट सही आणि नावाचा वापर करून त्यांच्याच नावाने वरिष्ठांकडे खोटा माफीनामा व तक्रारअर्ज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भास्करराव पाटील (वय ५४) हे रत्नागिरी ‘एमआयडीसी’मध्ये उपअभियंता (स्थापत्य) म्हणून कार्यरत आहेत. २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. अनोळखी व्यक्तीने पाटील यांच्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करून एक बनावट अर्ज तयार केला. हा अर्ज ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयात सादर करण्यात आला. संबंधित बनावट अर्जात फिर्यादी पाटील यांच्याकडून काही बाबींची कबुली दिल्याचा बनाव करण्यात आला होता. पदोन्नती मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला. राजकीय दबावाचा वापर करून स्वतःविरुद्धच्या चौकशा रोखल्या. शासकीय नियमांचे उल्लंघन करून रत्नागिरी आणि पुणे (विमाननगर) येथे भूखंड लाटले. ​बदली टाळण्यासाठी वरिष्ठांवर दबाव टाकला. या सर्व कृत्याबद्दल मी ‘दिलगिरी’ व्यक्त करतो, असा मजकूर त्या अर्जात होता.
आपल्या नावाचा वापर करून आपली बदनामी केली जात असल्याचे लक्षात येताच फिर्यादी भास्करराव पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. आपल्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा गैरवापर करून आपल्याला मानसिक त्रास देण्यासाठी हे कारस्थान केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा खोटी सही करणारा आणि बनावट अर्ज पाठवणारी व्यक्ती कोण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com