अजितदादा यांच्यासारखा कणखर नेता पुन्हा होणे नाही!

अजितदादा यांच्यासारखा कणखर नेता पुन्हा होणे नाही!

Published on

20849
0852

अजितदादा यांच्यासारखा कणखर नेता पुन्हा होणे नाही!

कार्यकर्त्यांच्या शोकसंवेदना; सिंधुदुर्गात सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली

सावंतवाडी, दोडामार्ग
सावंतवाडी, ता. ३० ः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी व दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील पक्ष कार्यालयात विशेष शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचा गौरव केला. ‘शब्दाला पक्का आणि कामाला वाघ’ अशी ओळख असलेले अजितदादा सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत असत. एकदा दिलेला शब्द पूर्ण करणे, प्रशासनावर असलेली पकड आणि विकासाची दूरदृष्टी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही न भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
या शोकसभेत तालुकाध्यक्ष उदयराव भोसले, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, एम. डी. सावंत, युवक कार्यकर्ते अनंतराज पाटकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, शहराध्यक्ष ऑगस्तीन फर्नांडिस तसेच ॲड. सत्यवान चंदवनकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी दीपक देसाई, गुरुदत्त कामत, नंदकिशोर नाईक, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेंद्र देसाई, नितेश पाटील, शहाजीराव भोसले, राम लाखे, डॉ. तुषार भोसले, सौ. रंजना निर्मल, रामचंद्र निर्मल, शशिकांत तळवणेकर आदी उपस्थित होते.
---------------
नांदगाव दशक्रोशी
नांदगाव, ता. ३० ः राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा आदर्श सर्वांनी जपला पाहिजे, अशा भावना नांदगाव दशक्रोशीतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.
नांदगाव तिठा येथे नांदगाव दशक्रोशीच्यावतीने आयोजित श्रद्धांजली सभेत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, प्रकाश पारकर, पंढरी वायंगणकर, पत्रकार भगवान लोके, भालचंद्र साटम आदी मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. ‘‘अजितदादा पवार यांच्यासारखा कणखर नेता पुन्हा होणे नाही’’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, समीर शेटये, रघुनाथ लोके, गुरुनाथ आचरेकर, सुशील इंदप, इरफान साटविलकर, यासीन मास्के, मनाली गुरव आदी उपस्थित होते.
---
चौकट
20850
अजितदादांचे आकर्षक रेखाचित्र
सावंतवाडी ः येथील बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी आर्यन बेलेकर याने अजितदादांचे आकर्षक रेखाचित्र साकारले.
या उपक्रमात अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, कर्तव्यभावना आणि लोकाभिमुख प्रशासनाची प्रेरणा रुजावी, हा या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या श्रद्धांजली कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय वेले, विभागप्रमुख तुकाराम मोरजकर, प्रा. सिद्धेश नेरुरकर, प्राजक्ता वेंगुर्लेकर, राधा गावडे, चेतन जगताप, आत्माराम शिरोडकर, तुळशीदास नाईक, धनंजय परब, अनिल बांदेकर, सुभाष राव, पल्लवी गावडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी चारुदत्त शंकरदास, तन्वी गावडे, विजय झोरे, कृष्णा पालयेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com