मतदार महायुतीला साथ देतील
20857
मतदार महायुतीला साथ देतील
संजू परब ः माजगाव येथे प्रचार सभा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः तालुक्यात महायुतीची ताकद पाहता विरोधकांचा टिकाव लागणार नाही. मतदार महायुतीने केलेल्या विकास कामांचा विचार करुन साथ देतील, असे प्रतिपादन शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी माजगाव येथे काल केले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित माजगाव, चराठा, ओटवणे, वेत्ये, सोनुर्ली आणि सरंबळे या गावातील मतदारांच्या एकत्रित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘माजगावमधून जिल्हा परिषदेसाठी विक्रांत सावंत तसेच पंचायत समितीसाठी दिलेले दोन्ही उमेदवार सक्षम आहेत. त्यांना मतदार नक्की साथ देतील. सावंत यांना ज्येष्ठ नेते (कै.) विकास सावंत यांचा वारसा लाभला आहे. या मतदारसंघातील मतदार महायुतीला पूर्ण ताकद देतील, असा विश्वास आहे.’
यावेळी जिल्हा परिषदचे उमेदवार सावंत म्हणाले, ‘माझ्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक आहे.(कै.) भाईसाहेब सावंत यांचा वारसा असल्याने पैसे देऊन आम्हाला माणसं गोळा करावी लागत नाहीत. प्रेम करणारी माणसं आम्ही कमावलीत. ही लोकं माझ्या परिवारातील आहेत. त्यांचा तसेच आमच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार.’ याप्रसंगी माजी सभापती अशोक दळवी, पंचायत समिती उमेदवार सचिन बिर्जे व उत्कर्षा गांवकर, माजगाव सरपंच रिचर्ड डिमेलो, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, चराठा सरपंच प्रचिती कुबल, सरमळे सरपंच विजय गावडे, ॲड. सचिन गावडे, माजी सभापती गौरी पावसकर, माजी सरपंच बाळू वाळके, माजी सरपंच नरेंद्र मिठबाकर, राजू कुबल, क्लेटस फर्नांडिस, गुंडू जाधव, आर. के. सावंत, सुरेश सावंत, श्याम कासार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

