शिंदे शिवसेनेच्या 
प्रमोद सांगवेकरांची 
पक्षातून हकालपट्टी

शिंदे शिवसेनेच्या प्रमोद सांगवेकरांची पक्षातून हकालपट्टी

Published on

20910

शिंदे शिवसेनेच्या
प्रमोद सांगवेकरांची
पक्षातून हकालपट्टी
कणकवली, ता. ३० : सांगवे (ता. कणकवली) शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद सांगवेकर यांची शिंदे शिवसेनेतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्‍याने ही कारवाई केल्‍याचे शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख संदेश पटेल, तालुकाप्रमुख दामोदर सावंत यांनी आज जाहीर केले.
शिवसेनेतर्फे याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले असून त्यात म्‍हटले आहे, की सांगवेकर हे शाखाप्रमुख म्‍हणून कार्यरत होते. त्‍यांनी पक्षाची कोणतीही परवानगी न घेता आणि वरिष्‍ठांच्या आदेशांचे उल्‍लंघन करून महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आपला उमेदवारी अर्ज हरकुळ बुद्रुक या जिल्‍हा परिषद मतदारसंघात दाखल केला आहे. ही कृती शिवसेनेच्या तत्त्‍वांना व शिस्तीला धरून नाही. त्‍यामुळे २७ जानेवारीपासून पुढील सहा वर्षांसाठी शिंदे शिवसेनेतून निलंबित करण्यात येत असल्‍यााचे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com