मठ आरोग्य उपकेंद्राला मिळाले प्रशस्तीपत्र
-rat३०p१७.JPG-
२६O२०८७४
लांजा ः गटविकास अधिकारी गिरी यांच्या हस्ते जावडे प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री हेडाऊ आणि मठ उपकेंद्रप्रमुख अरुणा वाघाटे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
-------
मठ उपकेंद्राला जिल्हा परिषदेचे प्रशस्तीपत्र
सीईओंकडून अचानक पाहणी; आरोग्यसेवेबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३०ः तालुक्यातील मठ आरोग्य उपकेंद्रातील नागरिकांना पुरवण्यात आलेल्या विविध सेवासुविधांची मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी पाहणी करून कौतुक केले. या उपकेंद्राला जिल्हा परिषदेच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन खास अभिनंदन करण्यात आले.
जावडे प्राथमिक आरोग्यकेंद्राअंतर्गत येणाऱ्या मठ उपकेंद्र येथे रानडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानांतर्गत अचानक भेट दिली. उपकेंद्रातील प्रसूतीगृह, लसीकरण कक्ष, हर्बल गार्डन यांची पाहणी केली. उपकेंद्र आयईसी, उपकेंद्रांतर्गत व बाह्यस्वच्छता तसेच आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम उपकेंद्रस्तरीय झालेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. कुटुंबकल्याण उद्दिष्ट १४० टक्के, एचपीव्ही लसीकरण १०० टक्के, उपकेंद्रात १ प्रसूती, राष्ट्रीय कार्यक्रम उद्दिष्ट पूर्तता, उपकेंद्रस्तरीय रेकॉर्ड परिपूर्ण अद्ययावत ठेवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. उपकेंद्राला प्रशंसा प्रमाणपत्र दिले. या संपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण उपक्रमशील आरोग्यसेविका व उपकेंद्रप्रमुख अरुणा वाघाटे यांनी केले. त्याला सर्व कर्मचाऱ्यांनी साथ दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र गटविकास अधिकारी गिरी यांच्या हस्ते जावडे प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री हेडाऊ, मठ उपकेंद्र प्रमुख अरुणा वाघाटे यांना प्रदान करण्यात आले. या वेळी आरोग्यसेवक विश्वजित काळे, अंजली गोरे, आझाद विचारे, प्रज्ञा कदम, विवेकानंद नाईक आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

