दशकपूर्ती उत्सवामध्ये समाजसेवेचाही गौरव
20918
दशकपूर्ती उत्सवात
समाजसेवेचाही गौरव
‘बांदा ज्येष्ठ नागरिक’चा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० : येथील आनंदी मंगल कार्यालयात ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा यांचा दशकपूर्ती सोहळा उत्साहात झाला. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजस रेगे, कार्याध्यक्ष प्रकाश सावंत, सचिव श्री. सपकाळ, बांदा ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे अध्यक्ष अन्वर खान, उपाध्यक्ष हनुमंत सावंत, उपाध्यक्षा अनुराधा मोर्ये, सत्कारमूर्ती एम. डी. मोरबाळे, अशोक परब आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदाचे पंचक्रोशीतील गेल्या दहा वर्षांतील कार्य व उपक्रम हे सामाजिक क्षेत्रातील सर्व संस्थांसाठी आदर्शवत ठरले आहेत, असे रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष शिवानंद भिडे यांनी सांगितले. दशकपूर्ती महोत्सवाचे औचित्य साधून मंचचे सदस्य श्री. मोरबाळे व श्री. परब यांनी केलेल्या मरणोत्तर देहदान संकल्पाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. मोरबाळे यांनी देहदानाचे महत्त्व व सामाजिक उपयुक्तता विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. हनुमंत मालवणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पाणदरे यांनी आभार मानले. महिला भगिनींच्या तिळगूळ व हळदी-कुंकू समारंभाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

