युवतींनो, तणावमुक्‍त जगा!

युवतींनो, तणावमुक्‍त जगा!

Published on

20922

युवतींनो, तणावमुक्‍त जगा!

डॉ. बिरमोळे : कणकवली कॉलेजमध्ये आरोग्‍य चिकित्सा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३० : शाळा, महाविद्यालयांतील युवतींनी जास्तीत जास्त तणावमुक्‍त जीवनशैलीमध्ये जगण्याला प्राधान्य द्यावे, तसेच कटाक्षाने संतुलित आहार घ्यावा तरच आपण सक्षम भावी पिढी घडवू शकू, असे आवाहन स्त्रीरोगतज्‍ज्ञ डॉ. शमिता बिरमोळे यांनी केले.
कणकवली कॉलेजमध्ये महाराष्‍ट्र मेडिकल असोसिएशनतर्फे मुलींसाठी आरोग्‍य तपासणी शिबिर आणि डॉ. शमिता बिरमोळे यांचे मार्गदर्शन झाले. यात त्‍यांनी ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज’ या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्‍या म्‍हणाल्या, की ‘‘पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज’ या समस्येचा त्रास अनेक महिलांना सोसावा लागतो. अनियमित मासिक पाळी, वजन वाढ, चेहऱ्यावर व शरीरावर अवांछित केसांची वाढ, मुरुमे, सतत थकवा ही याची प्रमुख लक्षणे आहेत. वेळेवर तपासणी व उपचार न झाल्यास भविष्यात वंध्यत्व, मधुमेह तसेच हार्मोनल असंतुलन यांसारख्या गंभीर समस्या उद्‌भवू शकतात. त्‍यामुळे मुलींनी नियमित व्यायाम, योगासने, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि तणावमुक्‍त जीवन जगण्याला प्राधान्य द्यायला हवे.’’
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे उपस्थित होते. त्यांनी मुलींना स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक महिला विकास कक्षप्रमुख प्रा. विद्या मारकड यांनी केले. यावेळी महिला विकास कक्ष सदस्य मीनाक्षी सावंत यांच्यासह इतर उपस्थित होते. प्रा. मिशाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्विटी जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com