बरणीमध्ये तोंड अडकलेल्या श्वानाची सुटकेसाठी तळमळ
21045
बरणीमध्ये तोंड अडकलेल्या
श्वानाची सुटकेसाठी तळमळ
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३१ ः येथे रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याला प्लास्टिक कुठेही फेकून मोकळे होणाऱ्या माणसांच्या बेजबाबदारपणाचा फटका बसला. बुधवारी (ता. २८) कुणीतरी फेकलेल्या प्लास्टिक बरणीत कुत्र्याचे तोंड अडकले. त्यामुळे त्याचे खाणे-पिणेही बंद झाले. सैरावैरा फिरत असलेल्या या कुत्र्याच्या मानेत अडकलेला डबा काही प्राणीप्रेमींनी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो माणसांना घाबरून त्याच अवस्थेत तेथून पसार झाला.
आज प्लास्टिकचा आणि मोबाईलचा वापर हा आपला अविभाज्य भाग बनला आहे. दोन्ही गरजेचे, पण तेवढेच हानिकारकही आहेत. मोबाईलचा अतिवापर मुले व युवा वर्गासाठी धोकादायक ठरत आहे. मात्र, प्लास्टिक कचरा अनेक शहरेच नाही तर आता ग्रामीण भाग व्यापत चालला आहे. पर्यावरण, पाणी, जमीन यासाठी धोकादायक आहेच, शिवाय प्राणी, पक्षी यांच्यासाठी जीवघेणे ठरू लागले आहे. दरवर्षी असंख्य गुरांचा बळी प्लास्टिकमुळे जात आहेत. कुणीतरी फेकलेल्या प्लास्टिक बरणीत कुत्र्याची मान अडकली. बरणीत खाद्य पदार्थांचा वास येत असल्याने त्याने बरणीत तोंड घातले आणि त्याची मान आतमध्ये अडकली. कुत्र्याने त्यातून निसटण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याची मान आत आणखीच अडकत गेली. त्यामुळे तो सैरावैरा पळू लागला. काहींनी त्याला पकडून बरणीपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, माणसांवरून भरवसा उडालेला हा कुत्रा दूर पळतच गेला. प्लास्टिकच्या धोक्यापासून मनुष्य प्राणीही आता दूर नाही, हे विसरून चालणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

